|| अभंग ||
जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत रहा ll धृ ll
खोदून पाया तव कुदळीने गाडूनी टाकी खडे मनीचे
खांब लावूनी नामरूपाचे घर बंधाया येत रहा ll १ ll
तव स्मरणाच्या अखंड भिंती उभ्या होऊ दे चहुबाजूंनी
आवागमना द्वार नकोची घर बंधाया येत रहा ll २ ll
वरती छप्पर तव धाकाचे घट्ट दणकट न उडणारे
आत असावे तू अन मी रे घर बंधाया येत रहा ll ३ ll
नको मजला कुठेही जाणे नको मजला दुसरे येणे
तुझीच पिपासा जीवनी असणे
असे घर तू बांधशील ना ? घर बांधाया येत रहा ll ४ ll
************************************************
|| अभंग ||
ज्याने धरिले हे पाय
आणि ठेविला विश्वास
त्यासी कधी न अपाय
सदा सुखाचा श्वास
हे पाय पुरातन फार
केवळ हाची हो आधार
साई साई म्हणता धार
धीर गंगेची अपार
हे पाय कैसे तुमचे,
हे तर आमुच्या सत्तेचे.
ह्यांना नाही सोडणार,
तू मरे-मरे तो मार.
जय जय राम कृष्ण हरि,
साईं झालासी त्रिपुरारी.
तू येसी आमुच्या दारी,
तू केवळ अनिरुद्ध हारी...
**************************************************
|| अभंग ||
तुझ्यासाठी बापू करीतो प्रयास !!
सोडीली मी लाज सर्वस्वाची !!१!!
सुदाम्याचे पोहे तुळशिचे पान !!
ह्याच्यापूढे माझा पाडा काय !!२!!
चिखालाचे हात फुल कैसे वाहू !!
टाळी वाजविन तुझ्या नामी !!३!!
अशुद्ध ही वाणी नाम कैसे घेऊ !!
चाखेन धूळी तुझिया पायी !!४!!
कासाविस झालो पाठी धावताना !!
जालुनी मजला शुद्ध करी !!५!!
पीपा म्हणे मागे पाहता उमगलो !!
बापू धावे माझ्या पाठी पाठी !!६!!
************************************************
|| अभंग ||
रुसून बसला बापू माझा कोणा कोपर्यात !!
नंदामाई आणा त्याला बले बले परतुन !!१!!
खटयाल हरि हा खोड्या करितो ठकवी जागो जाग !!
परि पकड़ता गुस्सा करतो पलुन जातो खास !!२!!
भूलभूलैया ह्याचा भारी तुला जरी हा दोष !!
तुच दाखवी मार्ग ह्यातुनी तोडुनी सारे कोष !!३!!
नटनाटकी दावी वाकुल्या भिववी छाया रंग !!
पीपा पकडतो पदर तुझा गे दावी मज श्रीरंग !!४!!
************************************************
मनाची ही वृत्ति , जाई बपूपाशी !!
राहो बापू चरणी नित्य सदा !!१!!
लंगडे प्रारब्ध बहिरेच ज्ञान !!
आंधले कारण नूरो आता !!२!!
अनिरुद्धराया कृपा करी आता !!
प्रेमाच्या प्रवाहा वाहू देई !!३!!
सदा नामघोष आनंदे निर्भर !!
डोलू समाधाने तुझ्या पायी !!४!!
निष्ठावंत भावे सेविता चरण !!
पिपा भाग्यवंत विश्वमाजी !!५!!
***********************************************

पुष्प उमलले जे माझे ! वाहिले तुलाची !
तुला तुझे देतानाही ! भरून मीच रही !!ध्रु !!
माझे तरी काय असे ! सर्व तुझेची रे देवा !
तुझे असो तुझ्यापाशी ! मीच होय तुझा !!१!!
बापू बापू माझे गाणे ! अनिरुद्ध ताल !
गाऊ नाचू तुझ्या रंगे ! सदा सर्वकाळ !!२!!
धन्य धन्य झालो आम्ही ! सूखे सर्व ठायी !
adyapipadad's abhang
ABHANG II-