|| हरी ओम ||
बापू या वेळी आपल्या मोठ्या आईच्या "शिवा" या नामावर बोलत होते.
शिव म्हणजे काय तर पवित्र संस्कृत मध्ये शैव म्हणजेच पवित्र करते ते...
१ मिलीग्राम शिवामध्ये जर १ अब्ज कोटी किलोग्राम अशुभ टाकले तरी ते अशुभ शुभच होते, पवित्रच होते.
शिवत्वाची कार्य प्रणेती अशी ती "शिवा"....
पावित्र्याची कार्यप्रनेती अशी ती "शिवा"...
परम शिव म्हणजे परम पवित्र आणि त्याले ते पावित्र्य पुरवते ती "शिवा"
ORIGINAL पवित्र शक्ती म्हणजे "शिवा".
जी अदिती, तीच नारायणी, आणि तीच शिवा....>
तर शिव म्हणजेच शैव म्हणजे काय? दत्तगुरूंचे अनेक पैलू आहेत त्यातील एक महत्वाचा पैलू म्हणजे शैव म्हणजेच पावित्र्य त्याचेच प्रतिक पुरुष प्रतिक म्हणजे शिव आणि स्त्री प्रतिक म्हणजे शिवा ..
तसेच दत्तगुरूंचा अजून एक महत्वाचा पैलू म्हणजेच आधार त्याचेच पुरुष प्रतिक म्हणजे नारायण आणि स्त्री प्रतिक म्हणजे नारायणी...
दत्तगुरूंचा अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे सृजन म्हणजेच CREATIVITY त्याचेच पुरुष प्रतिक म्हणजे ब्रम्हा आणि स्त्री प्रतिक म्हणजेच अदिती...
तर या मध्ये शिवा म्हणजे शिवाची पत्नी नव्हे तर शिवला शिवत्व पुरवणारी आदिमाता, नारायणी म्हणजे नारायणाची पत्नी नव्हे तर नारायणाला आधार तत्व पुरवणारी आणि अदिती म्हणजे ब्रम्हदेवाची पत्नी नव्हे तर ब्रम्हदेवाला सृजनशक्ती पुरवणारी अशी ती आदिमाता....
जी अदिती, तीच नारायणी, आणि तीच शिवा.... आणि तीच ती आपली आदिमाता चंडिका...
अदिती म्हणजे काय? तर जी दिती नाही ती म्हणजेच जिच्याकडे संहार धर्म अजिबात नाही आणि जी फक्त स्रजनालाच SUPPORT करते.
त्यातूनच ३ संप्रदाय निर्माण झाले.
शैव संप्रदाय, नारायण संप्रदाय आणि ब्रम्ह संप्रदाय..
शैव संप्रदाय - म्हणजेच जे शिव आणि पार्वतीला मानणारे म्हणजेच पावित्र्याची पूजा करणारे...
नारायण संप्रदाय म्हणजेच नारायण आणि लक्ष्मी ला मानणारे म्हणजेच आधार तत्वाची पूजा करणारे ...
ब्रम्ह संप्रदाय म्हणजेच ब्रम्हदेव आणि सरस्वती ला मानणारे...
समजा एक "अ" नावाची व्यक्ती आहे ...
समजा कोणाला त्याचे सत्य बोलण्याबद्दल आदर आहे, कोणाला त्याच्या शिकवण्याबद्दल आदर आहे तर कोणाला त्याच्या शिस्ताबाद्धातेबद्दल आदर आहे..
त्याच प्रकारे त्या वेळी या तीन संप्रदायांचे दत्तगुरूंच्या वेगवेगळ्या पैलू वर असलेले प्रेम लक्षात घेऊन ऋषी व्यासांनी त्या तिघांचे एकत्रित असे स्वरूप म्हणून दत्तगुरू आणि मत गायत्री हि दोन नवे पुढे मांडली....
आणि म्हणूनच दत्तागुरुनी या तिन्ही संप्रदायाचे प्रतिक असलेला .. आपला तीन मस्तकाचा म्हणजेच नारायण, ब्रम्हदेव आणि परमशिव यांचे एकत्र प्रतिक असलेले दत्तगुरू या रुपात अनसूया मातेच्या कुशीत प्रकट झाले.
शिवा म्हणजे जी सर्व काही पवित्र करते...
पवित्र करणारी बसिक शक्ती म्हणजे "शिवा"..
ती पवित्र तर करतेच पण अपावित्र्याला देखील ती पवित्रच करते.
"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते || "
हा आपल्या आईचा सर्वात जवळचा मंत्र आहे. या मंत्रामध्ये आईची तिन्ही नावे अर्थपूर्ण रीतीने एकत्रित आणली आहेत...
गौरी म्हणजेच अदिती म्हणजेच देवांची माता....
मांगल्ये म्हणजेच सतत मंगल करणारी, जी सतत मंगल करत असते, पुरुषार्थ साध्य करते अशी ती...
आणि शरण जाण्यास फक्त तूच उचित आहेस...
तर अशी ती केव्हा आपल्या आयुष्यात कार्य करायला म्हणजेच केव्हा ती आपल्या वर प्रसन्न होते तर...
"होत न आग्या बिनु पैसारे"
जेव्हा मनुष्य पुरुषार्थासाठी प्रयास करू लागतो त्या वेळी.
जेव्हा मनुष्य सहा पुरुषार्थापैकी एक जरी पुरुषार्थ साध्य करायचा प्रयत्न करतो त्याच्या पाठी ती आदिमाता महिषासुरमर्दिनी उभी राहते. एवढेच नव्हे तर ती तिन्ही पातळीवर म्हणजेच सूक्ष्म, स्थूल आणि तरल या तीनही पातळीवर ती त्याच्या पाठी उभी राहते.
मनुष्याच्या (आपल्या ) भूतकाळात जे काही पाप आपल्याकडून घडले ते पवित्र करते. एवढेच नव्हे तर आपल्या आत आणि बाहेर जे काही आणि जेवढे काही पाप आहे ती त्या सर्वाला पवित्र करते.
त्याचेच उदाहरण म्हणून बघू.....
आपण श्वास आत घेतो म्हणजेच संस्कृत मध्ये "पूरक" आणि श्वास बाहेर टाकतो म्हणजेच संस्कृत मध्ये "रेचक" क्रिया...
श्वास आत घेऊन बाहेर सोडणे यामधील क्रियेला किंवा याला "अंतरकुम्भ" असे म्हणतात आणि श्वास बाहेर सोडून आत घेणे यामधील क्रियेला किंवा याला "बाह्यकुम्भ" असे म्हणतात.
पण जेव्हा आपण पहिला श्वास घेतो त्यातून येणारे कण किंवा प्राणवायू आपण पहिल्या उच्छवासात बाहेर टाकत नाही.
आपण आत घेतलेला प्राणवायू हा आपल्या प्रत्येक पेशीत जातो आणि कार्य करतो. आपल्या शरीरातील ENZYMES, STRUCTURE, CHEMICALS यांना नवीन प्राण देतो.
आणि त्यातून जो नको असेल असा वाई कार्बन डाय.. बाहेर टाकतो. म्हणजेच पवित्र ते घेतो आणि अपवित्र बाहेर टाकून देतो. अंतरकुंभात या २ प्रक्रिया होतात.
तसेच आपण जेव्हा पाणी पितो ते सर्वत्र पोहोचवले जाते अगदी सर्व पेशींना बाहेरील द्रव्याला सर्व ठिकाणी पोहोचते त्याच बरोबर आधीचे जे पाणी असते जे वापर करून बाहेर टाकायचे असते त्याचे रुपांतर मुत्रामध्ये होऊन ते विसर्जन केले जाते.
त्याचप्रमाणे अन्न खातो त्याचेही आपण जे खातो त्यातील जे आवश्यक आहे ते त्या त्या पेशीपर्यंत पोहोचते आणि जे टाकायचे आहे त्याचे रुपांतर विष्ठे मध्ये होऊन ते विसर्जित केले जाते....
तर या तिन्ही क्रियांमध्ये शिवत्व आहे म्हणजेच सर्व काही पवित्रच होते. आणि त्या आदिमातेच्या आशीर्वादाशिवाय त्या ३ गोष्टी व्यवस्थित होऊ शकतच नाहीत.
काही लोक दिवसभर हसत नाहीत त्यामुळे त्यांचे तोंड उघडे नसते आणि त्यामुळे पोट साफ होत नाही. हसायला शिका. तोंड घट्ट मिटून बसू नका. हसल्याने प्रकृती व्यवस्थित राहते.
आपल्याला यावरूनच कळेल कि आदिमातेने आपल्या आयुष्यात - नित्य दैनंदिन जीवनात किती शिवत्व भरले आहे ते वरील तीन क्रिया व्यवस्थित पार पडल्या तरच आपली प्रकृती ठीक राहते नाहीतर ..... ती बिघडते.
तर यावरून आपल्या लक्षात येते कि ती आदिमाता आपल्या प्रत्येकाची किती वेळा आठवण काढते ते....
एका मिनिटाला आपण १८ वेळा श्वास घेतो प्रत्येक श्वासाला ती आपली आठवण काढते, म्हणजेच १ तासाला १०८० वेळा आणि २४ तासाला २५,९२० वेळा कमीत कमी २१,६०० वेळा ती आपली अव्याहत स्मरण ठेवते आणि आपण तिची आठवण एकदा करायला पण कंटाळा करतो.
(असे का?)
आपण १०८ वेळा पठाण करतो त्या मध्ये पहिले आणि शेवटचे पठाण फक्त मनापासून असते नाहीतर मधल्या १०६ वेळा केलेल्या पठनामध्ये आपल्याला सर्व जगाची आठवण येते. आणि समजा जर डोळे बंद करून पठण केले तर संपलेच....
काय गरज आहे डोळे बंद करायची सद्गुरूचा (बापूचा) फोटो डोळ्यासमोर (पुढे) ठेवा.
आम्ही साधी माणसे आहोत. आणि मी (म्हणजेच बापू) फक्त पेपर पुरवणारा, कोपी पुरवणारा आहे. ध्यान लावायची गरज नाही. काही नाही तर ते दृश्य (सद्गुरूचे रूप) तर त्या मेंदूत फिट्ट होईल.
"जेवढे जास्तीत जास्त करता येईल तेवढे नामस्मरण(गुणसंकीर्तन/ पठण) करा."
पण त्याच बरोबर मी नामस्मरण(गुणसंकीर्तन/ पठण) करत नाही म्हणून मी फालतू आहे असा विचार सुद्धा करू नका.
पुरातन काळापासून दिवसाचे ३ भाग आहेत. ब्रम्ह, विष्णू आणि महेश म्हणजेच सकाळ, दुपार आणि रात्र या प्रत्येक भागात २४ मिनिटे नामस्मरण(गुणसंकीर्तन/ पठण) असे म्हणजेच जवळ जवळ १ तास त्या साठी द्या.
जेव्हा तुम्ही २४ मिनिटे देता तेव्हा तोम्ही पास होता म्हणजेच ३५/१०० (शंभर पैकी पस्तीस) मार्क मिळतात.
जेव्हा या तिन्ही भागात तुम्ही २४ मिनिटे देता तेव्हा FIRST CLASS मिळतो. आणि यापेक्षा जास्त केले तर DISTINCTION मिळते.
बापू म्हणतात
"कमीत कमी पास तर व्हा गध ड्यानो "
आणि यामध्ये जीव ओतून केले तर गोल्ड मेडल काय? (काहीच नाही) काय मिळेल त्याची तुलना नाही. दादांनी नेमून दिलेली उपासना करत असाल तर WELL N GOOD, गुरूने दिलेली गोष्ट असेल तर उत्तमच आणि तुम्हाला जी आवडत असेल ती केलीत तरी चालेल.
आणि दुसरी कोणती चुकीची गोष्ट केलीत तर बरोबर मी ठोकेन. नको ते चाळे करू नका.
पण म्हणून त्याचे "स्वागत गीत" (नेहमीचे ठरलेले कंटाळवाणे गाणे) होऊ देऊ नका. आणि सोमवारी शंकराची उपासना, मंगळवारी गणपतीची, बुधवारी कोणाची, गुरुवारी कोणाची.... असे तर मुळीच करू नका....
ती शिवा प्रत्येकाचे स्मरण करते, प्रत्येकाचे कार्य करते, म्हणजेच तिचे शिवत्वाचे कार्य शरीरामध्ये करते. ती आपले प्रत्येकाचे २१,६०० वेळा स्मरण करते, आपण कमीत कमी मग तिची आठवण ठेवायला नको का?
दर मिनिटाला कळत १८ वेळा ती प्रचीती देते, ७२ वेळा दर मिनिटाला नकळत प्रचीती देते.
ज्ञान (कळत) - श्वास घेतो तो आपल्याला कळतो.
अज्ञान (नकळत) - हृदयस्पंदन, आपल्या नाडीचे ठोके जे आपल्याला सहज कळत नाहीत.
"ज्ञान मार्ग सोडा आणि भक्ती मार्ग वापरा"
आपण जेव्हा जनमतो तेव्हा जो श्वास घेतो त्या वेळी "सो" असा उच्चार (आवाज) होतो आणि जेव्हा श्वास सोडतो (उच्छ्वास) तेव्हा "हम" असा उच्चार (आवाज) होतो. प्रकृतीने आपल्याला जन्मतः च "सोहम" हा जप दिला आहे.
यातूनच समजते कि भक्ती, नामजप हि मूळ प्रवृत्ती आहे.
तसेच "ॐ" म्हणताना हवा आत घेतली जाते. (म्हणजेच शिवत्व आत घेतले जाते.)
तर या ॐ मधील अ, उ, आणि म म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश....
आणि त्यांच्यावर असणारी अर्धमात्रा (अर्धकोर) म्हणजेच "आदिमाता" आणि वरचा बिंदू म्हणजेच "दत्तगुरू" म्हणजेच मूळ बिंदू.
तांत्रिक मार्गातील लोक ॐ म्हणताना हवा बाहेर टाकतात.
आपण एकमेकांना "हरी ॐ" असे म्हणतो म्हणजेच दिवसात किती वेळा आत घेतो. हे शिवत्व आत घेण्यासाठी दिलेले INSTRUMENT म्हणजेच "हरी ॐ".
समजा यात पण ॐ म्हणताना चुकून हवा बाहेर टाकली गेली तर ?
त्यासाठीच मी (बापूने) पुढे हरी लावले आहे, हरी म्हणजे चुकीचे हरण करतो तो म्हणूनच "ॐ" च्या आधी "हरी" लावले आहे.</span>
आणि "हरी ॐ" हे शिवत्व आत घेण्याचे INSTRUMENT आहे.
मी (बापू) सदैव तुमचा भार वाहीन....
"तुमचा मी भार वाहीन सर्वथा |
नाही हे अन्यथा वाचन माझे"
आणि या INSTRUMENT ला कधीच CHARGING , रेपैरिंग करावे लागत नाही.त्याला अपोआप सद्गुरू CHARGE करत असतो. "हरी ॐ" बोलताना पवित्र भाव ठेवा ते INSTRUMENT PROPERLY चालेल आणि हरी वापरल्यामुळे MISTAKE व्हायचा CHANCE च नाही.
||हरी ओम||
बाप्पा जेवढे समजले तेवढे मांडायचा प्रयत्न केला आहे त्यात पण काही चूक झाली असेल तर सांभाळून घे रे ......
|| हरी ओम ||
या गुरुवारी बाप्पा जास्त काही बोलला नाही....
बाप्पाने आपल्या मोठ्या आईच्या "शिवा" या नावाचा नक्की अर्थ काय ते सांगितले......
तसेच शिव आणि शिवा यातील फरक समजावून सांगितला.
तर "शिव" म्हणजे अतिशय पवित्र ... कि ज्या मध्ये कितीही अशुभ अपवित्र टाकले तरीसुद्धा ते पवित्रच होणार.
१ ग्राम शिव मध्ये जर १ करोड ग्राम अशुभ टाकले तरीही ते अशुभ सुद्धा पवित्रच होणार...
आणि शिवा म्हणजे हे शिवतत्त्व पुरवणारी..... अशी ती... म्हणजेच आपली आदिमाता.... म्हणजेच "शिवा"
तसेच नारायणी म्हणजे नारायणाची पत्नी नव्हे, तर नारायणाला शक्ती पुरवणारी अशी ती म्हणजेच ... "नारायणी"..
वालूकेशवर लिंग हे त्या शिवाचे सर्वोच्च प्रतिक आहे असे बाप्पाने सांगितले.
बाप्पा म्हणाले कि आज आपण जे याला बिल्वपत्र अर्पण करणार आहोत म्हणजेच १ मस्तक आणि २ हात जे त्या च्या समोर अर्पण करणार आहोत तर त्यावेळी आपण त्या पावित्र्याशी, त्या पवित्र करणाऱ्या मशीनशी जोडले जाणार आहोत....
कि जी आपल्यातील सर्व अशुभाला पवित्र करेल.....
|| हरी ओम||
*******************************************************************
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (०३ - ०३- २०११)
"दुर्गा क्षमा शिवा धात्री..."
दुर्गा स्वरुप आपण बघितले.."दुर्गा दुर्गति हारिणी".अनेक जण गोंधळून जातात. दुर्गति म्हणजे नक्की काय ? दुर्गतिचे उ.दा. द्यायचे झाले तर दलदलीत पडणे एक टोक तर गटारात पडणे दुसरे टोक आहे.
दलदल म्हणजे चिखल, ह्यातुन माणुस जेव्हढे बाहेर यायचा प्रयत्न करतो, तेव्हढाच तो आत रुतत जातो व शेवटी जीव गमावुन बसतो. तर गटारात पडल्यावर सर्वांगाला घाण लागते.इथे जीव जात नाही, पण अंग सगळे घाणीने, दुर्गंधीने माखुन जाते.अश्या प्रकारच्या दुर्गति पासुन वाचवणारी ती दुर्गा.
एका सामान्य स्त्रिची तिच्या पुर्ण आयुष्यात वेगवेगळी रुपे बघायला मिळतात. तिच्या पित्यासाठी ती कन्या असते, तिच्या पतीसाठी पत्नी, भावासाठी बहिण, मुलासाठी आई, सुनेसाठी सासू अशी वेगवेगळी रुपे दिसतात. अशीच सत्तेची सुद्धा वेगवेगळी रुपे दिसतात. सत्ता हे सुद्धा स्त्रीलिंगीच आहे. जी मुळ आध्यात्मिक वैश्विक सत्ता आहे ती म्हणजे आदिमाता. जी असंख्य ब्रम्हांडे आहेत त्या सर्वांवर सत्ता चालते ती फक्त आदिमातेचीच.
अश्या ह्या आदिमातेला प्राप्त करुन घेण्यासाठी भक्तिमार्ग व तंत्रमार्ग ह्या दोन मार्गांनी उपासना करतात. वैदिक मार्ग व तंत्र मार्ग ह्यांच्या मध्ये भक्ति मार्ग असतो. तंत्र मार्गात आपला फायदा कसा होईल एव्ह्ढाच विचार असतो.
इथे फरसाणवाल्याचे उ.दा. आठवते. फरसाणवाला नेहमी कागद खाली ठेवून त्यात फरसाण घालुन वजन करतो..ह्यात त्याचा नेहमी कितीतरी फायदा होत असतो,कारण त्या कागदाचे वजन पण त्या फरसाणच्य वजनात add होते, आपल्याला हे समजु शकत नाही. अशी गणिते सामान्य माणसाला कळत नाहीत. वैदिकमार्गातील तंत्रांमधुन अशी अनेक रुक्ष गणिते निर्माण झाली व तंत्रमार्ग तयार झाला. असे हे तंत्र शास्त्र ह्या आदिमातेला आदिमाता न मानता केवळ आदिसत्ता मानतात.
ह्या तीन मार्गातील फरक आपल्याला बर्फाची फ़क्टरी व हिमालय पर्वत ह्यांच्या उ.दा.वरुन लक्षात येईल. वैश्विक सत्तेच्या गणितामध्ये बर्फाचे पाणी किती अंशाला गोठते ह्यावरून बर्फाच्या फ़क्टरी मध्ये बर्फ तयार होतो.हिमालयावर पण बर्फ दिसतो, कदाचित बर्फाची फ़क्टरीमधुन हिमालयापेक्षा जास्त बर्फ तयार करता येईल.मग ह्या दोघांत फरक काय ? तर हिमालयामधुन गंगा तसेच अन्य बारामास नद्या वाहत असतात. ज्यामुळे अनेक पवित्र तिर्थक्षेत्र आम्हांला मिळतात.
तांत्रिक बर्फाची फ़क्टरी काढतात, त्यातुन बर्फ विकता येतो पण लोकोपयोगी नद्या आम्हांला मिळू शकत नाही.आम्हांला पवित्र करणारी तिर्थक्षेत्रे मिळू शकत नाहीत .
तिथे फक्त रोकडा व्यवहार चालत असतो. म्हणजेच इथे आपल्या लक्षात येते की,
- तंत्र मार्ग म्हणजे बर्फाची फ़क्टरी
- वैदिक मार्ग म्हणजे हिमालय व
- भक्ती मार्ग म्हणजे त्याच हिमालयाच्या आश्रयाने वाहणारी बारामास नदी गंगा, जी सर्व लोकांना पातकातुन मुक्त करण्याचे कार्य करत असते.
ही गंगा आली कशी? तर, त्या आदिमातेने आपल्या क्षमेचा एक छोटासा अंश महाविष्णूच्या चरणकमळातून निघणार्या ह्या त्रिपथगामिनी मध्ये घातला.हीच गंगा .म्हणुन आज ही त्या क्षमेच्या अंशामुळे सगळ्यांच्या पापाचा नाश करु शकते. इथे अंश म्हणजे नक्की काय? हे आम्हांला कळले पाहिजे. अध्यात्माचा मुलभूत नियम आज समजावुन घ्यायचा आहे.
जसे पाणी हे जलतत्त्वाचा अंश आहे, मग तो एक पाण्याचा छोटासा थेंब असो कि पुर्ण समुद्र असो . उ.दा.एक व्यक्ती पुर्ण आयुष्य भर जे काही बोलते ते त्याच काळातील बाकिचा समाज जे बोलतो त्या सर्वांचा एक अंश असते. ह्याचाच अर्थ अंश ही लहानशी किंवा मोठी गोष्ट नसुन जे काही संपूर्ण त्याचे एक परिमाण म्हणजे अंश. ह्याची अतिशय सुंदर व्याख्या मला (प.पू.बापू) एका सामान्य आदिवासी व्यक्तीकडुन शिकायला मिळाली. त्या आदिवासींनी त्यांच्या गाण्यातुन हे तत्त्च खुप सुंदररित्या समजावले, की, हा सुर्य जो आम्हांला प्रकाश देतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर केव्हढी मोठी जागा दिसते, ती डोळ्यासमोर दिसणारी सर्व जागा म्हणजे भगवंत, व आपल्या डोळयाची जेव्हढी size त्यातुन आत जाणारा सुर्यप्रकाश म्हणजे माणुस. जी गोष्ट मोठ्या द्न्यानी लोकांना नीटपणे समजू शकली नाही ती ह्या प्रेमळ आदिवासींना सहजपणॆ कळली. म्हणून स्वत:ला द्न्यानी समजु नका.त्यांमूळे गर्व येतो आणि मग पतन निश्चित असते.
क्षमा समजुन घ्यायचे असेल तर अंश व अंशी समजुन घ्यायला पाहिजे. तिच्या क्षमा ह्या नावावर मी (प.पू.बापू) युगानुयुगे बोलु शकतो. कारण तिचे खरं नाव क्षमा हेच आहे. बाकीची तिची नावे ही त्या क्षमेचा अंश आहेत. म्हणुन प्रत्येक स्त्रीकडे क्षमेची खुप मोठी शक्ती असते, ही शक्ती कधीच विसरु नका. ह्याचा अर्थ वाईटाला क्षमा करा असा नाही. मात्रुवात्स्ल्यविंदान मध्ये आपण बघतो वाईटाचा नाश करण्यासाठी ह्या आदीमातेने रक्तदंतिकेचे स्वरुप घेतलेच. पण वाईटाचा नाश करून, पापांचे डोंगर कमी करुन ती क्षमाच करत असते हे लक्षात घ्या. क्षमा हे नाव देविच्या पुजनात कधीच सापडत नाही.पण मी (प.पू.बापू) सांगतो म्हणुन आजपासून लक्षात ठेवा, तिचे खरे नाव क्षमा हेच आहे. प्रत्येक स्त्री कडे ही क्षमा उपजतच असते. मुल कितीही वाईट वागले तरी आई क्षमाच करत असते, कलियुगात मात्र ह्याला अपवाद दिसुन येतात.
एकदा एक ओळ्खिचे नवरा- बायको दिसले खुप हताश वाटत होते, घाबरत होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळले. त्यातील Mr.X ची आई विधवा होती व Mrs.X चे वडिल विधुर होते. त्या दोघांनी पळुन जावून लग्न केले.त्यामुळे हे नवरा- बायको आता एकमेकांचे बहिण- भाऊ झाले होते. प्रसंग खरंच खुप बिकट होता.ह्या Mr.& Mrs.X ची मुले सुध्दा आता लहान नव्हती. तेव्हा शांतपणे त्यांच्या मामाला बोलवुन त्यांना Mr.x ला दत्तक घ्यायला सांगितले, ह्यामुळे आता हे दोघे नात्याने आतेबहीण- भाऊ होत होते, व आतेबहीण- भावांचे लग्न होते. अश्या तर्हेने परत लग्न लावुन दिले..किती मोठ्या प्रसंगातुन त्यांची सुटका सहजपणे झाली. कलीयुगात काहिही घडू शकते ह्याचे हे उ.दा.आहे, असे exception देखील असतात .
प्रत्येक स्त्रीकडे जी क्षमा असते ती तिने हृदयात धारण करायला पाहिजे.ह्या क्षमेमुळेच युगानुयुगे स्त्रीचा सन्मान केला गेला आहे. पतीने जर १०० ग्रुम पुण्य मिळत असेल तर पत्नीला आपोआप त्यातले ५० ग्रम पुण्य मिळते. तिचे जेव्हढ्या प्रमाणात पतीवर जास्त प्रेम तेव्हढे तिला जास्त पुण्य.
तुम्ही सगळ्या माझ्या(प.पू.बापू) लेकी आहात.म्हणुन प्रत्येक स्त्रीला आज सांगावेसे वाटते.प्रत्येक पत्नीसाठी तिचा पती हा देव असलाच पाहीजे. जो वाईट नाही व जो तुमच्यावर मनापासुन प्रेम करतो अश्या पती- पत्नीच्या नात्यात पती हा पत्नी साठी देव असलाच पाहीजे. मग पतीचीही जवाबदारी येते की त्याने देवासारखे वागलेच पाहीजे. म्हणजेच त्याने पत्नीचा आधार बनलेच पाहीजे. पतीचा आधार आहे,ह्या खात्रीवर स्त्री जगात कुठल्याही संकटांना सामोरी जावु शकते.कारण स्त्री मध्ये क्षमा तत्व असते . पृथ्वीकडे पण हीच क्षमा असते ... तिचे नावच मुळी क्षमा आहे... आपण तिला लाथा मारतो, तिच्यात नांगर खुपसतो पण तरीही ती आपल्याला क्षमाच ती आपल्याला नेहमी चांगलेच अन्न, जल देत असते .
पुरुषाचा आधार गुणधर्म शिवाकडुन आला आहे. परमात्मा हा महाविष्णू रुपाने नेहमी गती देत असतो तर शिव रुपाने नेहमी आधार देत असतो.आधाराशिवाय गती असु शकत नाही. प्रुथ्वी व सुर्याची गती आपण बघतो ती गुरुत्वाकर्षणाच्या आधारावरच असते. सगळ्या गोष्टी एकमेकांपासुन योग्य अंतरावर ठेवुन आधार देणे हा गुरुतत्त्वाचा प्रमुख गुणधर्म. प्रत्येक पुरुषाने हे लक्षात ठेवले पाहीजे, त्याने आपल्या पत्नीचा आधार बनलेच पाहीजे.
स्त्रीची क्षमा व पुरुषाचा आधार हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा कितिही संकटे आली तरी संसार सुखाचाच होतो.
क्षमा हाच मोठा आधार आणि खरा आधारच क्षमा करु शकतो. म्हणूनच शिवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण केले.ब्रह्मा- सरस्वती, विष्णू-लक्ष्मी, शिव- पार्वती ही तीन आद्य पति- पत्नीची जोड्पी आदिमातेने उत्त्पन्न केली. ह्या आदीमातेने स्वत:ही अनुसुया रुपात स्वत:च्याच अत्रि रुपाशी विवाह करुन संसार केला व तिला पुत्रही झाले.
ह्या आदीमातेने प्रत्येक गोष्ट स्वत: आधी करुन दाखवली.तिच्या क्रुतीतुन तिने आम्हांला आध्यात्मिक क्षमा दिली. मला (प.पू.बापू) तिचे सगळ्यात आवडणारे स्वरुप हेच आहे..क्षमा.तिच्याएव्हढी क्षमा कोणाकडेही नाही.
एक साधे उ.दा.घ्या. डोळे बंद करुन गुरुच्या फोटोसमोर शांतपणे बसा व आयुष्यामध्ये लहानपणापासुन काय काय चुका केल्या त्या आठवा. १० मिनीटे पण तुम्हांला बसवणार नाही. स्वत:च्याच चुका आठवुन वेड लागेल.
मग कळेल की एव्हढ्या चुकांच्या सजा मला मिळाल्याच नाहीत.ही क्षमा त्या जगन्माऊलीकडूनच आली.
दिवसभरात किती चुका करतो, कितीवेळा धावत्या गाडीतुन उतरतो , कितीवेळा एखाद्या विषयाचा अभ्यास करायला आळ्स करतो, आणि नेमका तोच विषय पेपरला येतो,कितीवेळा रागाच्या भरात नको ते बोलून जातो.कोण सावरते ह्यावेळी ? ती आदिमाताच..
हे बघितल्यावर लक्षात येते की ह्या सर्व चुकांना क्षमा तिनेच केली.तिने मला (प.पू.बापू) जे पाठवले आहे ते मी क्षमा करावी म्हणुन नाही तर तिची क्षमा तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी, प्रवाहीत करण्यासाठी.. मला(प.पू.बापू) पाठवले आहे.
मी (प.पू.बापू) पोस्टाची पेटी आहे एव्हढंच लक्षात ठेवा.बापु म्हणजे त्याच्या आईची पोस्टाची पेटी. मी (प.पू.बापू) क्षमा करत नाही ... माझा तो गुणधर्म नाही.... माझा गुणधर्म आहे आधार. क्षमा फक्त माझी आईच करू शकते....तिच्या क्षमेची अनेक उ.दा. आहेत.
सत्ययुगाच्या शेवटी वैखानर नावाचा एक राजा होता.त्याने बलवान होण्यासाठी परमशिवाची तपश्चर्या केली आणि खूप ताकद मिळवली. नंतर त्याला वाटले परमशिवा पेक्षा जास्त ताकद आदिमातेची आहे मग तिच्या एवढी ताकद मिळवण्यासाठी त्याने आदिमातेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. आदिमातेला माहित होते,हयाची इच्छा जरी राक्षसी असली तरी मुळात तो चांगला आहे.म्हणुन त्याची तपश्चर्या पूर्ण होण्या आधीच आदिमाता त्याच्या वर प्रसन्न झाली. त्याने आदिमातेकडे वर मागितला कि मला तुझ्या एव्हढे तुल्यबळ व्हायचे आहे. त्यावर आईने सांगितले ,"तुझी जेव्हढ्या प्रमाणात तपश्चर्या तेव्हढे बळ तुला प्राप्त होईल".त्याच्या लक्षात आले आपली तपश्चर्या कमी प्रमाणात झाली आहे ,त्यामुळे आदिमाते एव्हढे बळ अजुन मिळाले नाही, म्हणुन परत तपश्चर्या सुरु केली, आदीमाता पुन्हा प्रकट झाली व त्याला थांबवले.पुन्हा त्याने आदीमातेकडे ,"मला तुझ्या एव्हढे तुल्यबळ व्हायचे आहे" हेच मागितले, आईने त्याला समजावले व विचारले," तुला माझी जागा घ्यायची आहे का?"
तेव्हा त्याने उत्तर दिले नाही... मला तुझ्याही पुढे जायचे आहे...वैखानर आता दत्तगुरूंची जागा घ्यायला बघत होता.आदीमातेने त्याला समजावुन बघितले पण त्याने ऐकले नाही,. त्याने परत तपश्चर्या सुरु केली. तेव्हा आदिमातेने त्याला सांगितले, एका दिवसापुरता व एका रात्रीपुरता माझी सर्व ताकत तुला प्राप्त होईल.तिची ताकत आली म्हणजे तिचे पावित्र्य पण आले. तिच्या पवित्र्याच्या द्रुष्टीमुळे तो प्रत्येक वाईट गोष्टिंचा नाश करत जातो..शेवटी त्याच्या लक्षात येते सर्व वाईट म्हणुन त्याने संपुर्ण जगाचाच नाश केला.हे लक्षात येताच त्याला पश्चाताप होतो व तो स्वत:चाच नाश करायला तयार होतो, तेव्हा आदिमाता त्याला थांबवते,व सांगते "सर्व जग आहे तसेच आहे, काहिच घडले नाही, हा सर्व एक भास होता.हे असे का घड्ले ?कारण क्षमा नाही, म्हणुन तु सर्वांचा नाश केलास ह्यासाठीच आधी क्षमा मिळवावी लागते आणि मगच सामर्थ्य."
उत्सवात आपण इथे शत्रुघ्नेश्वरीचे पुजन करणार आहोत,त्यावेळी आपल्याला हेच आईकडे मागायचे आहे की, "आई, तू आमच्या शत्रूंचा अशा रीतीने नाश कर कि त्यांच्यापासून आम्हाला त्रास होणार नाही आणि त्यांचे पण चांगले होईल.त्यांच्यापण जीवनात बदल घडुन येईल." सध्याच्या काळात हे शत्रुघ्नेश्वरीचे पुजन अत्यंत आवश्यक आहे.
जयन्ति मंगला काली ..अशी तिची लाखो नावे असली तरी ती सर्व तिच्या क्षमा ह्या एकाच नावाची अंश आहेत.ती क्षमाशील आहे हे जाणायला कधिच चुकू नका.ह्या आईचा खरा गुणधर्म क्षमा हाच आहे , हे सदॆव काळजात धारण करा. बापूंचा हा शब्द कधीच विसरु नका. ही आदीमाता म्हणजे Ultimate क्षमा आहे. ही अंशी आहे आणि बाकीचे तिच्या ह्या नामाचे अंश आहेत.
हरी ॐ
------------------------------ ------------------------------ -----------
सुचना: पुढील गुरुवारी संध्या.६-३० वाजता उपासना सुरु होईल. नंतर प्रत्येकाला वालुकेश्वरावर बेल पत्र अर्पण करुन दर्शन घेता येईल.(प्रत्येकाने येते वेळी बेल पत्र स्वत: घेवुन यायचे आहे.)
(Courtesy: http://www. manasamarthyadata.com/)
Excerpts from Thursday Discourse dated 24 Feb 2011
Date: 26/02/2011
हरि ॐ
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (२४-०२-२०११)
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (२४-०२-२०११)
"दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते.."
दुर्गा नाव आपण बघितले, त्यानंतर येते ती क्षमा. मनुष्य नेहमी जे जे चांगले करायचे ठरवतो ते ते नमके घडत नाही तर जे जे नाही करायचे असते तेच नेमके घडते.असे होणे म्हणजेच दुर्गती...म्हणून जी ही दुर्गती हारणारी दुर्गा ..तीच पुढे क्षमा बनून आमच्या जीवनात येऊ शकते. क्षमा म्हणजे नक्की काय ? हे आधी आपल्याला समजले पाहीजे. जे काही आतापर्यंत पाप केले ते सर्व पुसून शुन्य करणे म्हणजे क्षमा असे आपल्याला वाटते. देवाचे नाव घेतले म्हणजे आपण कितीही वाईट वागू शकतो असे काहींना वाटते. प्रत्येक जण आपापल्या परीने सोयीचा अर्थ काढत असतो. क्षमा समजून घेण्यासाठी प्रथम आपल्याला दुसऱ्यांना क्षमा करता आली पाहीजे. मनुष्य नेहमी स्वत:ला क्षमा करत असतो परंतु , दुसर्याला मात्र त्याला क्षमा करता येत नाही.
इथे एक लक्षात घेतले पाहीजे की, मला जर परमेश्वराकडून क्षमा हवी असेल तर मला प्रथम माझ्या आयुष्यातील इतर चांगल्या लोकांना त्यांच्या चुकांसाठी क्षमा करता आले पाहीजे. एखादी व्यक्ती ९९ वेळा माझ्याशी चांगली वागली असेल आणि एकदा जर वाईट वागली तर आपण ते वाईट लक्षात ठेवून त्या व्यक्तीशी लगेच बोलणे बंद करतो.
नेहमी स्वत:च्या चुकांना मनुष्य माफ करत राहतो, स्वत:च्या चुकांसाठी परिस्थितीला कारणीभूत ठरवतो. अन्यायाच्या नावाखाली छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडत असतो. इथे क्रोध तुमच्या मनातच असतो म्हणून तो व्यक्त होतो,हे मान्य करत नाही.तर त्यासाठी अनेक सबबी मात्र सांगत फिरतो.
जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात फसते तेव्हा ती लगेच दुसर्यावर त्याचा आरोप करते,आपल्या फसवणुकी साठी दुसर्याला दोषी ठरवते. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती फसते तेव्हा ती कुठल्या ना कुठल्या लोभामुळेच फसत असते हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहीजे.
माणुस म्हटले की हातून चुका घडणारच पण महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, एखाद्या चांगल्या मनुष्याच्या चुका जगभर सांगत बसू नका.
मी (प.पू.बापू) नेहमी बघतो, ८० वर्षाची स्त्री देखील ५८ वर्षापुर्वी तिचा सासूने काय अपमान केला होता ह्यावरून नवर्याशी भांडताना दिसते.नवरा पण तेव्हा पत्नीचे वडिल कसे वागले ह्यावरून तिच्याशी वाद घालतो. इथे पती-पत्नीचे एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी ते एकमेकांना क्षमा करत नाहीत. लग्नानंतरही "आमच्याकडचे - तुमच्याकडचे" ह्या गोष्टी संपत नसतात.विशेषत:स्त्रिया स्वत: सासू होईपर्यंत सासरच्या आपल्या प्रेमाच्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकली असेल तरी ती किती काळ उगाळत बसायची?असे करत बसल्याने त्यात प्रेमाचे नाते उरतच नाही. लक्षात ठेवा ज्या प्रमाणात मनुष्य दुसर्यांना क्षमा करायला विसरतो त्या प्रमाणात त्याचा प्रवास कलीयुगाकडे होत असतो.
जे लोक मुळातच वाईट आहेत अश्यांबद्द् ल मी इथे बोलत नाही, पण ज्या आपल्या प्रेमाच्या
व्यक्ती आहेत त्यांच्यांवर तरी चिडू नका. एखाद्या वेळी केलेली मस्करी वेगळी..पण जर तीच मस्करी परत परत घडली तर ती मस्करी उरत नाही, त्याची जागा क्रोध घेतो आणि मग तुम्ही हा राग बाहेर व्यक्त करायला निमित्त शोधत राह्ता.
पती-पत्नी जेव्ह्ढे एकमेकांना ओळखतात तेव्हढे दुसरे कोणीही ओळखु शकत नाही.जेव्ह्ढं आई आणि मुलाचे नाते पवित्र असते तेव्हढेच पती-पत्नीचेही नाते पवित्र असते.पतीच्या नुसत्या हालचाली वरुन देखील पत्नी त्याच्या मनातील भाव ओळखु शकते.तसेच आई-वडील देखील मुलांच्या हालचाली वरुन त्यांच्या मनात काय चालू असेल ते ओळखू शकतात. हे ज्ञान कशातून होते ? फक्त प्रेमातूनच...म्हणून क्षमा सुद्धा प्रेमातूनच येत असते.
जर पती- पत्नीचे एकमेकांवर प्रेम असेल आणि तरी एकमेकांच्या चुका काढत असतील तर खरच ते थांबवा. आज सर्व पुरुषांना मुद्दामहून एक सांगावेसे वाटते.."If you want to understand your wife you have to love her and once you love her then there 'No Need left' to Understand her !!! "नेहमी स्वत:च्या चुकांना मनुष्य माफ करत राहतो, स्वत:च्या चुकांसाठी परिस्थितीला कारणीभूत ठरवतो. अन्यायाच्या नावाखाली छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडत असतो. इथे क्रोध तुमच्या मनातच असतो म्हणून तो व्यक्त होतो,हे मान्य करत नाही.तर त्यासाठी अनेक सबबी मात्र सांगत फिरतो.
जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात फसते तेव्हा ती लगेच दुसर्यावर त्याचा आरोप करते,आपल्या फसवणुकी साठी दुसर्याला दोषी ठरवते. परंतु, जेव्हा एखादी व्यक्ती फसते तेव्हा ती कुठल्या ना कुठल्या लोभामुळेच फसत असते हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहीजे.
माणुस म्हटले की हातून चुका घडणारच पण महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की, एखाद्या चांगल्या मनुष्याच्या चुका जगभर सांगत बसू नका.
मी (प.पू.बापू) नेहमी बघतो, ८० वर्षाची स्त्री देखील ५८ वर्षापुर्वी तिचा सासूने काय अपमान केला होता ह्यावरून नवर्याशी भांडताना दिसते.नवरा पण तेव्हा पत्नीचे वडिल कसे वागले ह्यावरून तिच्याशी वाद घालतो. इथे पती-पत्नीचे एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी ते एकमेकांना क्षमा करत नाहीत. लग्नानंतरही "आमच्याकडचे - तुमच्याकडचे" ह्या गोष्टी संपत नसतात.विशेषत:स्त्रिया स्वत: सासू होईपर्यंत सासरच्या आपल्या प्रेमाच्या व्यक्तीची एखादी गोष्ट चुकली असेल तरी ती किती काळ उगाळत बसायची?असे करत बसल्याने त्यात प्रेमाचे नाते उरतच नाही. लक्षात ठेवा ज्या प्रमाणात मनुष्य दुसर्यांना क्षमा करायला विसरतो त्या प्रमाणात त्याचा प्रवास कलीयुगाकडे होत असतो.
जे लोक मुळातच वाईट आहेत अश्यांबद्द् ल मी इथे बोलत नाही, पण ज्या आपल्या प्रेमाच्या
व्यक्ती आहेत त्यांच्यांवर तरी चिडू नका. एखाद्या वेळी केलेली मस्करी वेगळी..पण जर तीच मस्करी परत परत घडली तर ती मस्करी उरत नाही, त्याची जागा क्रोध घेतो आणि मग तुम्ही हा राग बाहेर व्यक्त करायला निमित्त शोधत राह्ता.
पती-पत्नी जेव्ह्ढे एकमेकांना ओळखतात तेव्हढे दुसरे कोणीही ओळखु शकत नाही.जेव्ह्ढं आई आणि मुलाचे नाते पवित्र असते तेव्हढेच पती-पत्नीचेही नाते पवित्र असते.पतीच्या नुसत्या हालचाली वरुन देखील पत्नी त्याच्या मनातील भाव ओळखु शकते.तसेच आई-वडील देखील मुलांच्या हालचाली वरुन त्यांच्या मनात काय चालू असेल ते ओळखू शकतात. हे ज्ञान कशातून होते ? फक्त प्रेमातूनच...म्हणून क्षमा सुद्धा प्रेमातूनच येत असते.
खरंच हे वाक्य जराही चूक नाही...कारण सगळ्या स्त्रियांकडे एकच rational असते ते म्हणजे हा माझा नवरा आहे..बस्स..बाकी काही नाही. स्त्री इतर सर्व आप्तांशी वागताना सुसंगत वागेल पण नवर्याशी मात्र नाही, कारण एकच भावना की, हा माझा आहे.
इथे असं म्हणायचे नाही की नवर्याने पत्नीच्या मुठीत राहायचे. पुरुषाने नेहमी कर्ता, खंबीर असलेच पाहीजे. कारण ज्या घरातील स्त्री dominating असते, नवर्यावर ओरडत असते, त्या घरात मुलगे भित्रट तर मुली चालू बनतात.व ज्या घरातील पुरुष व्यसने करतो, पत्नीवर ओरडत राहतो त्या घरातील मुलगे बेछूट वागणारे तर मुली भित्रट बनतात. म्हणूनच आज इथे सांगावेसे वाटते की, जर नवरा-बायकोला भांडायचेच असेल ना तर खरंच मुलांसमोर कधीच भांडू नका..कारण लहान मुलांना क्षमा करता येत नाही.
लहान मुले जे काही डॊळ्यांनी बघतात (घरातील मोठ्या व्यक्तींचे वागणे) ते ते सर्व आपल्या मनात तसंच्या तसे लिहून ठेवतात.त्यामुळे पुढे मोठेपणी ते पण तसेच वागतात. जर स्त्रीला वाटत असेल की आपल्या सुनेने, मुलाने आपल्याशी नीट वागावे तर आधी तिला आपल्या सासुशी नीट वागता आले पाहीजे, ती जसे वागणार ते बघुन तिचा मुलगाही तिच्याशी तसेच वागणार, हे लक्षात ठेवले पाहीजे, कारण मुलांकडे क्षमा हा गुण नाही. क्षमा हा फक्त परमेश्वराचाच गुणधर्म आहे, तो माणसाकडे उपजत नसतो,माणसाला हा गुण आत्मसात करावा लागतो. सत्त्व गुणाशिवाय क्षमा येत नाही, व क्षमेशिवाय सत्त्व गुण येत नाही. सत्त्व गुण हा भाव शारिरी गुणांपेक्षा वरचढ असणारा व दु:खांना दुर करणारा असतो.हा सत्त्व गुण येत असतो तो फक्त पवित्र आचरणातून, पवित्र आहार-विहारातुन म्हणजेच परमेश्वराचे गुणसंकीर्तनामधुन, तसेच इतरांच्या केलेल्या सेवेतुन.. जेव्हा आपल्याकडुन दुसर्यांना (आप्तांना) क्षमा केली जाते तेव्हा त्या क्षमेमधुन आपल्याला १० ग्रॅम क्षमा, १० ग्रॅम सुख, १० ग्रॅम दु:खाची निव्रूत्ती,१० ग्रॅम सत्त्व गुण प्राप्त होत असतो .
क्षमा कोणाला करायची हे आम्हांला नीट कळले पाहीजे. क्षमा सुद्धा एक प्रकारचे दानच आहे .ते सत्पात्रीच व्हायला हवे..म्हणून आपल्या आप्तांना क्षमा करायला शिका. आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना तुम्ही क्षमा करायला शिकलात की, ही चंडिका तुमच्या जीवनाची दुर्गती दुर करते...आणि तीच क्षमा असते हे लक्षात घ्या.
मनुष्य क्षमा कशी शिकतो हे बघणे पण खुप सुंदर आहे. लहान बालक पहिल्यांदा क्षमा करते ते आपल्या आईला..आपले बाळ एखादी गोष्ट चुकीची करत असेल तर आई त्याला फटके मारते..हे फटके म्हणजे त्या बाळासाठी टॉनिकच असते.कारण त्यामुळे बाळ चुकिच्या गोष्टींपासुन दुर होते. .ह्या ठिकाणी जरी आई फटके देत असली तरीही ते बाळ काही वेळाने जाऊन आईलाच बिलगते.ते तिच्यावर रागवत नाही..इथे हे बाळ पहिल्यांदा क्षमा करायला शिकते.म्हणुनच क्षमा ही फक्त प्रेमातुनच येत असते. इथे असं म्हणायचे नाही की नवर्याने पत्नीच्या मुठीत राहायचे. पुरुषाने नेहमी कर्ता, खंबीर असलेच पाहीजे. कारण ज्या घरातील स्त्री dominating असते, नवर्यावर ओरडत असते, त्या घरात मुलगे भित्रट तर मुली चालू बनतात.व ज्या घरातील पुरुष व्यसने करतो, पत्नीवर ओरडत राहतो त्या घरातील मुलगे बेछूट वागणारे तर मुली भित्रट बनतात. म्हणूनच आज इथे सांगावेसे वाटते की, जर नवरा-बायकोला भांडायचेच असेल ना तर खरंच मुलांसमोर कधीच भांडू नका..कारण लहान मुलांना क्षमा करता येत नाही.
लहान मुले जे काही डॊळ्यांनी बघतात (घरातील मोठ्या व्यक्तींचे वागणे) ते ते सर्व आपल्या मनात तसंच्या तसे लिहून ठेवतात.त्यामुळे पुढे मोठेपणी ते पण तसेच वागतात. जर स्त्रीला वाटत असेल की आपल्या सुनेने, मुलाने आपल्याशी नीट वागावे तर आधी तिला आपल्या सासुशी नीट वागता आले पाहीजे, ती जसे वागणार ते बघुन तिचा मुलगाही तिच्याशी तसेच वागणार, हे लक्षात ठेवले पाहीजे, कारण मुलांकडे क्षमा हा गुण नाही. क्षमा हा फक्त परमेश्वराचाच गुणधर्म आहे, तो माणसाकडे उपजत नसतो,माणसाला हा गुण आत्मसात करावा लागतो. सत्त्व गुणाशिवाय क्षमा येत नाही, व क्षमेशिवाय सत्त्व गुण येत नाही. सत्त्व गुण हा भाव शारिरी गुणांपेक्षा वरचढ असणारा व दु:खांना दुर करणारा असतो.हा सत्त्व गुण येत असतो तो फक्त पवित्र आचरणातून, पवित्र आहार-विहारातुन म्हणजेच परमेश्वराचे गुणसंकीर्तनामधुन, तसेच इतरांच्या केलेल्या सेवेतुन.. जेव्हा आपल्याकडुन दुसर्यांना (आप्तांना) क्षमा केली जाते तेव्हा त्या क्षमेमधुन आपल्याला १० ग्रॅम क्षमा, १० ग्रॅम सुख, १० ग्रॅम दु:खाची निव्रूत्ती,१० ग्रॅम सत्त्व गुण प्राप्त होत असतो .
क्षमा कोणाला करायची हे आम्हांला नीट कळले पाहीजे. क्षमा सुद्धा एक प्रकारचे दानच आहे .ते सत्पात्रीच व्हायला हवे..म्हणून आपल्या आप्तांना क्षमा करायला शिका. आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना तुम्ही क्षमा करायला शिकलात की, ही चंडिका तुमच्या जीवनाची दुर्गती दुर करते...आणि तीच क्षमा असते हे लक्षात घ्या.
असेच परमेश्वराकडेही मला ती माझी आई आहे ह्याच भावाने बघता आले पाहीजे. परंतु मनुष्य परमेश्वराला कधीच क्षमा करत नाही. सगळे चांगले घडत असताना एखादी वाईट गोष्ट घडली तर लगेच त्यासाठी परमेश्वराला दोष दिला जातो.
जेव्हा एखादी हवी असलेली गोष्ट मिळत नाही अश्या वेळी परमेश्वराकडे ती आई आहे व ती जे हिताचे असेल तेच देणार ह्या लहान बाळाच्या भुमिकेतूनच आपल्याला बघता आले पाहीजे.
इथे माझ्या (प.पू.बापू) माईचे एक उदाहरण सांगावेसे वाटते, एकदा घरात काही कार्य असल्याने बरीच मंडळी होती. माई नेहमीप्रमाणे देवाची एक जपमाळ पुर्ण करुन उठली, तेव्हा तिथे काही खेळ्णी पडली होती,त्यामुळे तिच्या पायाला ठेच लागली. तेव्हा तिथे जमलेल्या काही स्त्रियांपैकी एक जण म्हणाली, "एवढी देवाची माळ करुन पण पायाला ठेच लागली, काय उपयोग झाला देवाचे नाव घेवून ?"
त्यावर माईने उत्तर दिले, "माळ केली होती,म्हणुन ठेचेवर तरी निभावले नाहीतर फ्र्यक्चरच झाले असते"
माईचे हे शब्द ,हा भाव कधीच विसरू नका.असा जेव्हा तुमचा भाव असेल तेव्हा तुमच्या मार्गावर माझी (प.पू.बापू) आई ही दुर्गती हा्रिणीच असेल.
ह्याच्या पुढे नाव आहे ते शिवा म्हणजे परम पवित्रता देणारी, परम कल्याण करणारी.नंतर येते ती धात्री...धारण करणारी, आधार देणारी.
मग नाव येते स्वाहा..आहुती देणारी, परमेश्वराला अर्पण करणारी.
आणि नंतर नाव आहे ते स्वधा..पितरांचे श्राध्द करताना स्वधा काराचे खुप महत्त्व आहे.जे देवांचे पुजन करताना स्वाहा काराचे महत्त्व तेच स्वधा काराचे महत्त्व आहे. तुमचा आत्ताचा जन्म व तुमचे आधीचे सर्व जन्म ह्यांना भक्ती पुरविण्याचे काम स्वधा करते.आम्हांला स्वधा काराचा अर्थ नीट कळला तर आम्हांला ह्या जन्मासोबत आमच्या आधीच्या जन्माचेही पाप नाहिसे करता येते.
स्वाहा ही आधीच्या जन्माचे पुण्य वर्धन करते तर स्वधा आधीच्या जन्मांचे पाप हरण करते.
आज कळेल आपल्याला की हा गजर किती महत्त्वाचा आहे.ह्या गजरात तुमच्या ह्या जन्मा बरोबर तुमच्या आधीच्या जन्मांपर्यंत जाण्याची ताकत आहे.जसा गुरुमंत्र तुमचा सांभाळ करणार तसाच हा गजरही करणार आहे. हा गजर प्रत्येकाच्या अंतरंगात उतरला पाहीजे.
कंटाळा आला असेल तर हा गजर नुसताच करा.. सी.डी. न लावता सुद्धा हा गजर करुन बघा...समोर चंडिका आई उभी आहे...असं दृश्य समोर आणा..त्यापुढे आपले बापू, नंदाई आणि सुचितमामा बसले आहेत..बस्स बाकी काही नाही...गजर करताना बेधुंद व्हा, तल्लीन व्हा, बेभान व्हा.जसा एक भोळा वारकरी होतो अगदी तसेच मला इथे प्रत्येकजण आईच्या गजरात तल्लीन झालेला हवा आहे.सगळी दुखणी विसरून जा..मनापासुन गजर करा, अतिशय प्रेमाने.
हरि ॐ
** प्रवचनानंतर बापुंनी सांगितले की, उत्सवापर्यंत "जयन्ति मंगला काली.." हा गजर दर गुरुवारी १५ मिनिटे श्री हरी गुरु ग्राम येथे लावला जाणार आहे व प्रत्येकाने ह्या गजरात आनंदाने सामील व्हायचे आहे.
प्रवचनानंतर हा गजर झाल्यावर प.पू.बापूंनी सांगितले की, गजराच्या वेळी "आई"साक्षात येथे उभी होती.आज उत्सवाचे तिला आमंत्रण दिले होते, ते आमंत्रण स्विकारायला ती प्रत्यक्ष इथे आली. आज आली म्हणजे उत्सवाला देखिल येणारच...ॐ नमश्चण्डिकायें.
हरि ॐ
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (१७-०२-२०११)
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (१७-०२-२०११)
सुचना : पुढच्या गुरुवार पासुन वालुकेश्वराचे इथे पुजन केले जाईल. व तिसर्या गुरुवारी सर्वांना बेल पत्र वालुकेश्वरावर अर्पण करता येतील.
“जयन्ति मंगला काली, भद्रकाली कपालीनी…”
“जयन्ति मंगला काली, भद्रकाली कपालीनी…”
गेल्या गुरुवारी आपण कपालीनी हे नाम बघितले. ह्या नामाच्या बाबतीत एक सुंदर गोष्ट सांगायची राहीली होती. वाल्मिकी रामायणामध्ये राम वनवासात गेल्यावर भरत अयोध्येत राह्ताना शपथ घेतो , की १४ वर्षाचा काळ संपल्यानंतर जर रामाचे चरण दिसले नाही, तर तो अग्नी काष्ट भक्षण करेल. १४ वर्षाचा काळ संपायची वेळ जवळ आली आहे हे बघुन भरत अग्नि प्रज्वलित करतो. तेव्हा हनुमत येवुन सांगतात, की श्रीराम पुष्पक विमानातुन येत आहेत .
हे ऐकून आनंदीत होवुन भरत म्हणतो … हनुमंता, “तुला १ लाख गाई, १ हजार ग्राम (गावे), १६ अतिशय सुंदर , कुलवंत सुशिल अश्या तरुणी (सकुंडला) अर्पण करतो.” सकुंडला ह्याचा अर्थ ज्यानी इथे स्त्रीया म्हणुन चुकीचा घेतला , ते हनुमंताने स्त्रीया स्विकारल्या असा अर्थ काढतात. इथे सकुंडला म्हणजे षोडशी कला. जी श्री विद्या आहे त्याचा जो मंत्र आहे त्याला षोड्षी कला आहेत. त्यातली १५ अक्षरेच (कला) मनुष्या ला माहीत असतात. ह्यातील १६ वी कला फक्त हनुमंतच सर्व सामान्य भक्ताला देवु शकतो. तर जो दत्तात्रेयांच्या सांगण्या नुसार वागतो अश्या तपस्व्याला श्री दत्तात्रेय ही १६ वी कला (अक्षर) देतात व विद्या पूर्ण करुन घेतात.
हनुमंत व दत्तात्रेय ह्या दोघांच्या मध्ये आहे ते श्री सिद्धेश्वरी स्वरुप. म्हणजेच आदिमातेचे स्वरुप. ही श्री विद्या मिळावी अशी इच्छा असणारे मुमुक्षु जेव्हा सद्गुरु मंत्राचे सप्रेम नैष्ठिक अनुष्ठान (म्हणजे १०८*१२ वेळा जप) करतात, तेव्हा ही आदिमाता त्यांना हे १६ वे अक्षर बहाल करते.
परंतु श्री दत्तात्रेय व आदिमाता महीषासुरमर्दिनी ही श्री विद्या भक्ताला देताना हनुमंताच्या हातुनच देतात. सुर्याने हनुमंताकडुन ही विद्या सिद्ध करुन घेतली व भरताने त्याचे प्रमाण पत्र दिले. षोडषी विद्येचे प्रमाण पत्र भरताकडुनच प्राप्त होवु शकते.
सकुंडला म्हणजे आञा चक्रातील कुंडला शक्तिच्या धाकट्या बहिणी. हनुमंतला सुद्धा जी पुर्णत्व आणते ती कपालिनी. हनुमंतला श्री विद्येचे पुर्णत्व देणारी शक्ति ती कपालिनी हे आपल्याला ह्या नामाचे गायन करताना लक्षात आले पाहीजे. भरत राम भेटीच्या आधी हनुमंत भेटतो.. बिभिषण राम भेटीच्या आधी हि हनुमंत बिभिषणाला भेटतो.. राम - रावण भेटीच्या आधीही रावणासारख्या नीचाला सुद्धा हनुमंत आधी भेटतो. पण बिभिषणा साठी तो आश्वासक म्हणून येतो तर रावणासाठी तो लंका दहन करणारा म्हणून येतो. आम्हांला ठरवले पाहीजे हनुमंताला आमच्या आयुष्यात कसे आणायचे ते..
ह्याच बिभिषणाला हनुमंताने षोडशी विद्या दिली. कंठ कूप चक्राचे स्थान बिभिषणाला मिळाले.. कारण "तुम्हरो मंत्र बिभिषण माना..." हनुमंताचा शब्द बिभिषणाने मानला.. हनुमंताला सद्गुरु मानले म्हणून. अश्या हनुमंताला श्री विद्या देणारी ती कपालिनी. कपालिनी नंतर येते ते दुर्गा स्वरुप.
दुर्गा : अतिशय उग्र रूप, हिला हजार हात आहेत. दुर्गा.. दुर्गति हारिणी..
मनुष्याला स्वत:च्या कुकर्मामुळे जी दुर्गति प्राप्त होवु शकते ती दुर्गती हारिणी.
ही माझी आई. तीच अनसुया, तीच गायत्री, तीच सिद्धेश्वरी महिषासुरमर्दिनी. हीचे वर्णन खुप सुंदर केले आहे . " दुर्गा दुर्गपारा सारा भवानी.."
* · दुर्गा म्हणजे दुर्गति हारिणी..
* · दुर्गपारा म्हणजे अतिशय दुर्गम( Almost Impossible) असे जे चांगले आहे ते प्राप्त करुन देणारी. हनुमंतची समुद्र पार करताना एका तीरापसुन दुसर्या तीरावर घेतलेली उडी म्हणजे दुर्गपारा.
* · सारा म्हणजे ह्या विश्वात जी जी पवित्र गोष्ट .. कुठल्याही सूक्ष्म रुपापासुन ते विस्तृत रुपापर्यंत तर कुठल्याही विस्तृत रुपापासुन ते बीज रूपापर्यंत जे जे पवित्र ते ते सर्व देणारी ती सारा.
* · भवानी ह्या नावाचे १००८ अर्थ आहेत . पण आपल्यासाठी एकच अर्थ तो म्हणजे मुलाकडुन यशस्वी पराक्रम करुन घेणारी आई.
दुर्गा ह्या एकाच नामातुन ती जे अशक्य ते तुमच्या कडुन शक्य करुन घेवु शकते . शिवाजीची पाठराखण करणारी भवानीचीच तलवार होती. व सद्गुरु होते ते रामदास जे हनुमंतचीच ऊपासना करत. शिवाजीने जे मिळवले ते मलाही मिळु शकते फक्त त्यासाठी ती दुर्गा आहे हे मला प्रथम जाणले पाहीजे.
आमच्या अनेक पापातुन वाचवणारी ती एकमेव दुर्गति हारिणी आहे तिला अनसुया म्हणा, गायत्री म्हणा, कपालिनी म्हणा, अंजनीमाता म्हणा ती शेवटी एकच .
अतिशय प्रेमाने सगळे पुजन व गजर करत आहेत, पण हे फक्त उत्त्सवापर्यन्त न ठेवता आयुष्यभरासाठी करा.
मी कितीही पापी असेन तरी माझी मोठी आई बसली आहे हे लक्षात ठेवा. दुर्गति म्हणजे दलदलीत फसणे. ह्यातुन बाहेर काढते ती दुर्गा ..जी दलदलच नाहीशी करते . इतके हे सुंदर नाव आहे. हे तिचे एकटीचेच सामर्थ्य आहे म्हणुन आम्हाला दुर्गा हे नाव अतिशय पवित्र असले पाहीजे. दुर्गा प्रथम बलिकेच्या रुपात प्रगटली ती म्रुकुंड ऋषींच्या म्हणजेच कपिल मुनींच्या आश्रमात. जिथे ती सगळ्या देवांना दुर्गतीतुन बाहेर काढते.
मातृवात्सल्यविंदानम हा ग्रंथ खरंच प्रेमाने वाचा. सगळे नियम बाजुला सारुन मी (प.पु.बापु) हा ग्रंथ तुम्हाला दिला आहे.
सौम्य वत्सला अशी अनसुया जी बलिकेचे रूप धारण करते तीच दुर्गा रुप ही धारण करते. हिनेच कलि पुरुषाला एका भागाने निष्क्रिय केले. आणि त्यासाठी शस्र वापरले तेही एका भक्ताने पायावर वाहीलेले पळ्साचे पान. ही त्या दुर्गेची ताकत !! जी कपालिनी तीच दुर्गा ..जी प्रगट होते अनसुयेमुळे .त्यामुळे ह्या गजरात आपोआपच अनसुयेचेही स्मरण होते.
स्वाहा हे ही अनसुयेचेच स्वरुप ..म्हणजेच ह्या गजरात फक्त रण चंडिकेचीच रुपे नाहीत तर ह्या वत्सलेची पण रुपे आहेत. ह्या गजराला भाषेचीही कुठलीच अडचण नाही. इथे अजुन एक नाव आठवते ते नव दुर्गा..स्कंधमाता, कुष्मांडा ... अश्या प्रकारची तिची नऊ नावे आहेत. मृकंड ऋषींच्या नऊ शिष्यांनी ह्या दुर्गा स्वरुपाची तपश्चर्या करण्यासाठी मृकंड ऋषींकडे जप देण्याची विनंती केली.तेव्हा मृकंड ऋषींनी त्यांना प्रत्येकाला मंत्र दिले.त्या तपश्चर्ये मधुन त्यांच्यासमोर जी नऊ स्वरुपे प्रगट झाली ती म्हणजे नव दुर्गेची रुपे. आपण कोणी तपस्वी नाही, म्हणुन तप न करता कोण प्रगट्ली होती? तर अनसुया..म्हणुन आपण तिचेच स्मरण करुया.
"आई ती आई बहु मायाळु, लेकुरालागी अति कनवाळु ।
परि लेकरेच निघता टवाळु,कैसा सांभाळु करी ती ॥ "
ह्या ओवीचे proof फक्त मीच देवु शकतो. मी (प.पू.बापू) इतक्या टवाळ्क्या करुनही मला आईने सांभाळ्ले. म्हणून ह्याची १ अब्ज टक्के गॅरेंटी मीच देऊ शकतो. आईसारखे दिसणारे अनेक असतात परंतु खरी आई एकच असते. म्हणूनच आईसारख्यांकडे फिरत बसू नका. माझी (प.पू.बापू) आई, तुमची आई व्हावी म्हणून मी (प.पू.बापू) आलो आहे. ती जी मोठी आई आहे, ती तुम्हां सर्वांची व्हावी, तुम्ही स्वीकारावी, जेणेकरून तिला तुम्हांला बाळ म्हणून स्वीकारणे सोपे होईल .आणि ह्यासाठी लागणारा व्हिसा मीच(प.पू.बापू) मान्य करु शकतो. युगानुयुगे हे असेच आहे, तिने ठरवले म्हणून..ही दुर्गा तुमची आई व्हावी म्हणुन पेन घेवुन मी (प.पू.बापू) बसलो आहे, स्टॅम्प घेऊन नंदाई बसली आहे आणि सील लावायला सुचितदादा बसले आहेत.
आम्हांला ह्या दुर्गेला आई करायचे आहे ..आई ही मानायची गोष्ट नसते. आईचा उत्सव प्रेमाने साजरा करा, तिचा ग्रंथ प्रेमाने वाचा. ही सुवर्ण संधी आम्हांला मिळाली आहे.
"सद्गुरुसारिखा असता पाठीराखा... इतरांचा लेखा कोण करी.."
एका सद्गुरु तत्वाला शरण गेल्यावर काय काय मिळू शकते ते ह्या दुर्गा नामातून कळ्ते.
हीचेच पुढचे नाव आहे क्षमा. क्षमारुपाने ही गुरुक्षेत्रममध्ये उभी आहे. जोपर्यंत दुर्गा स्वरुपाला आम्ही आई मानत नाही,तोपर्यंत क्षमा स्वरुप आमच्या आयुष्यात येऊच शकत नाही. पुढ्च्या वेळेस आपण बघायचे आहे ह्या क्षमा स्वरुपाकडून क्षमा कशी प्राप्त करून घ्यायची व आपण श्रद्धावानांनी पुरुषार्थ कसा सिद्ध करायचा.

Excerpts from Thursday Discourse dated 3 Feb 2011
Date: 09/02/2011
हरि ॐ
श्री हरि गुरु ग्राम प्रवचन सदगुरू श्री अनिरुद्ध बापू ..(२७-०१-२०११)..
"जयंती मंगला काली .." हा गजर आपण बघत आहोत .
काली म्हणजे unconditional love . सगुण, ध्यान. स्मरण अश्या वाटेने जाता जाता आपण काली पर्यंत पोचलो.
आईच्या गर्भातला अंधकार म्हणेजच कालीचे रूप आपण बघितले. हा अंधकार म्हणजे खरी अजाणता आहे . गर्भात बाळाला ओढ असते ती आईच्या हृदयाच्या स्पंदनाची.. ह्या स्पन्दनाने , प्रेमाने बाळाचे आणि आईच नाते जोडले गेले असते आणि अश्या ह्या अंधकाराच्या रूपाला आंपण घाबरतो.
आपण प्रसन्नोत्सव करणार आहोत त्यात महाकालीची पूजा करणार आहोत. ते महाकालीचे रूप पाहून घाबरून जाऊ नका. महाकालीचे ते रूप सर्व अशुभ गोष्टींचा नाश करणारे आहे .
काली म्हणजेच निरव शांतता. कसलाच स्पंद , आवाज नाही अशी अवस्था. विश्व निर्माण होण्यापूर्वीची अवस्था म्हणजेच काली . निरव शांततेला मनुष्य खूप घाबरतो . परंतु ही निरव शांतता जेव्हा सत्त्व गुण रूपाने युक्त असते ,म्हणजेच परमेश्वराच्या स्वरुपात बेभान होण्याची जी अवस्था असते ती अवस्था म्हणजे काली. अशी अवस्था जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा ती भद्रकाली म्हणून कार्यरत होते.
भद्रकाली ही कालीचीच उत्क्रांत अवस्था आहे. उ.दा. १० वर्षाचे मुल जेव्हा २० वर्षाचे होते तेव्हा ते मुल १० वर्षापेक्षा वेगळे असते परंतु मूलतः एकच असते . अश्याच प्रकारे कालीच्याही दोन अवस्था आहेत - १) भद्रकाली २) उग्र काली . ह्या दोन्ही अवस्था भक्ताच्या उपासनेनुसार ठरत असतात. जेव्हा सत्त्व मार्गाने चंडिकेची उपासना केली जाते तेव्हा ती भद्रकाली रूपाने कार्य करते तर जेव्हा तांत्रिक मार्गाने तिची उपासना केली जाते तेव्हा ती उग्रकाली म्हणून तुमच्या जीवनात येते .
भद्रकाली म्हणजे कल्याण करणारी काली तर उग्र काली म्हणजे संहार करणारी काली.
कालीला आपल्या जीवनात भद्रकाली बनवायचे की उग्रकाली ते कालीवर नाही तर तुमच्या उपासनेवर ठरत असते. पंच "म" कारांनी कालीची उपासना केली जाते . हे पंच "म" कार तांत्रिक व वैदिक असे दोन प्रकारचे असतात. हे पंच "म" कार म्हणजे मद्य, मांस, मैथुन, मुद्रा व मत्स्य.
तांत्रिक "म"करतील मद्य म्हणजे दारू, मांस म्हणजे मटण, मत्स्य म्हणेज मासा, मैथुन,मुद्रा म्हणजे स्वपत्नी नसलेल्या स्त्रीसोबत स मागम करत उपासना करणे , हा बीभत्स प्रकार आहे.
जे चूक आहे ते चूकच आहे त्याला मी (प.पू.बापू) कधीही आयुष्यात बरोबर म्हटले नाही .
आपण ॐ म्हणताना हवा आत घेतो ,पर ंतु ही तांत्रिक मंडळी ॐ म्हणताना हवा बाहेर टाकतात वउपासनेच्या स्थानी स्वतिक उलटा काढतात. ह्यांच्या उपासनेमुळे भूत,प्रेत, पिशाच्च खुश होतात. आणि अश्या तांत्रीकांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपली कामे भराभर होतात, पण चुकीच्या मार्गाने आणि त्यावेळी ती काली माझ्या जीवनात उग्र संहार करणारी बनते.
परंतु जेव्हा हे पंच "म" कार मी वैदिक मार्गाने उपासना करण्यासाठी वापरतो तेव्हा तीच काली भद्रकाली म्हणून माझ्या जीवनात प्रवेश करते .
वैदिक "म"कारातील १) मद्यचा अर्थ मधु म्हणजेच मध. मधुचेच प्राकृत मद्य केले गेले. मधूचा दुसरा अर्थ आपल्या सहस्त्रार चक्रातून गळत असलेला मध. म्हणजेच भक्तीत रममाण होण्याची अवस्था. मद म्हणजे भक्तीत तल्लीन होणे. २) मांस म्हणजे तुमच्या मनातील प्राण्याचा बळी देणे जेणे करून तो पुन्हा उत्पन्न होणार नाही. ३) मस्त्य म्हणजे मीन क्रिया (मीन म्हणजे मासा) अनुलोम - विलोम ह्या प्राणायामाच्या क्रीयांनाच मीन क्रिया म्हटले जाते . ४) मुद्रा म्हणेज आसन, न्यास, नृत्यातील मुद्रा.पवित्र आसन घालणे, देवीच्या वरदहस्त, अधोहस्त अश्या पवित्र मुद्रांचे ध्यान करणे . ५) मैथुन म्हणजे मैथुन केंद्र ज्याला पराक्रमाचे केंद्र म्हटले जाते. म्हणजेच दृढ नियमाचे पालन करणे आम्ही ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करू , परमात्म्याचा शब्द पाळण्याचा प्रयास करू हा ही पराक्रमच आहे.
वैदिक "म"कारांनी उपासना करणे म्हणजे परमेश्वराशी सामिप्य जोडून ठे वणे.
उग्रकालीचे स्वरूप हे आमच्या चुकीच्या वागण्यामुळेच निर्माण होते . म्हणूनच कधीही ज्योतिष ,तांत्रिकांच्या मार्गाने जाऊ नका. त्यांच्या उपासना ते कधीही उघडपणे करत नाहीत . अश्या लोकांचा सहवासही आपल्याला नको.
कधी घरात चुकून देवीसमोर दारू देण्याची प्रथा असेल व तुम्हाला विरोध करता येत नसेल तर मागे सांगितल्याप्रमाणे जुईनगरला जावून एक दत्त याग किंवा दोन व्यंकटेश याग करावेत.
जेव्हा मनुष्य देवाशी कृतघ्न बनतो तेव्हा ही काली उग्रकाली बनते हे लक्षात ठेवा. ती रामवरदायिनी चंडिका रामासाठी भद्रकाली म्हणून तर रावणासाठी ती उग्रकाली म्हणूनच प्रगटली.
वाईट (तांत्रिक) पंच "म" कार उपासना व देवाशी कृतघ्नपणा ह्या दोन गोष्टींमुळेच ती काली उग्रकाली म्हणून जीवनात येत असते.
महाकाली व कालीत फरक आहे. काली ही उग्र काली रूप धारण करते तर महाकाली सगळे शांत करते.
विश्वाच्या उत्पत्ती पूर्वीची शांतता म्हणजे महाकाली व प्रलयानंतरची शांतता म्हणजेही महाकालीच. जो अतिशय प्रेमाने तीला आई म्हणून हाक मारतो त्याला तिच्या रूपाचे कधीच भय वाटत नाही.
इथे उत्सवात जे महाकालीचे रूप उभे राहणार आहे ती मूर्ती घडली आहे . मातृवात्सल्य विंदान मध्ये महाकालीचे जे वर्णन आहे अगदी तसेच रूप इथे उत्सवात असणार आहे. ही शक्ती स्वरूप असली तरीही आमच्यासाठी आमची आईच आहे म्हणून हिला कधीच आदि शक्ती म्हणू नका, नेहमी आदिमाताच म्हणा. हिला शक्ती म्हणून फक्त तो परमात्माच म्हणू शकतो पण तो ही तिला आई म्हणूनच हाक मारतो हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
हरि ॐ
------------------------------------------------------------------------------------------------------------
Excerpts from Thursday Discourse dated 27 Jan 2011
Date: 30/01/2011
हरि ॐ
श्री हरि गुरु ग्राम प्रवचन सदगुरू श्री अनिरुद्ध बापू ..(२७-०१-२०११)..
सूचना : श्री मंगला चंडिका प्रपत्ती च्या वेळी उडीद वापरतात ते त्रिविक्रमासाठी.. उडीद ही त्रिविक्रमाची आवडती गोष्ट आहे. त्यामुळे त्यात काहीही बदल करता येणार नाही.

नंतर बापूंनी प्रथम शुभंकर स्तवन म्हणून प्रवचनाला सुरुवात केली.
कंठ कूप पाषाण पूजनाच्या वेळी केलेला गजर आपण सगळीकडे ऐकतो, सर्वांना हा गजर अतिशय आवडला आहे. आपल्याला हा गजर कुठून आला हे पण माहित असायला हवे. देवीची तीन स्तोत्रे आहेत...कवच, अर्गला व किलक ही देवीच्या सुक्ताशी जोडलेली असतात, चंडी पाठच्या आधी ही स्तोत्रे म्हटली जातात. ह्यातील कवच हे प्रजापती ब्रह्माने लिहिले आहे व मार्केंडेय ऋषींना सागितले. दुसरे अर्गला हे महाविष्णूने लिहिले आहे तर किलक हे परम शिवाने लिहिले आहे.
" जयंती मंगला काली..." हा गजर म्हणजे संस्कृत स्तोत्रातील २ रा श्लोक. हा गजर पण आहे व मंत्र सुद्धा. ह्यात खूप स्पष्टपणे त्या आदिमातेचे प्रेम, कारुण्य, वास्त्यल्य सांगितले गेले आहे. तिचे रहस्य म्हणजेच खरेखुरे ज्ञान सांगणारा हा गजर आहे .
ही तीनही स्तोत्रे सुंदर असली तरी तरी ती म्हणण्यासाठी पूर्णपणे शुद्ध आचरण, शुद्ध उच्चार, शुद्ध मन, शुद्ध भाव असणे आवश्यक असते. त्यामुळे ती म्हणायला जाऊ नका .
ह्या उत्सवाच्या आधी देवीची जेवढी सुंदर स्तोत्रे आहेत ती सर्व मी ( प.पू.बापू) स्वत: तुम्हाला प्राकृत भाषेत पुस्तिका रुपात उपलब्ध करून देईन .
ह्या गजरात देवीची एकूण ११ नावे आहेत जयंती, मंगला, काली.... ही नावे म्हणजे तिचे कृपा करण्याचे मार्ग आहेत .
१) जयंती : जी जिंकत आहे, जी जिंकलेली आहे अशी विजयी असणारी. वर्तमान काळामध्येच सदैव विजयी असणारी व वर्तमान काळातच विजय प्रदान करणारी अशी जयंती.
जयंती नाव महाविष्णुने प्रथम उच्चारले. ही जयंती म्हणजे वैजयंती , महाविष्णूच्या, विठ्ठलाच्या गळ्यातील माळ,जी चंडिकेनेच तिच्या लाडक्या पुत्राला दिली.
ही विजय प्रदान करते, स्वतः विजयी होऊनच. त्यामुळे कुठल्याही असुरांचे तिच्या पुढे काहीही चालत नाही. Ultimate विजयी तीच असते .
जो तिच्या पक्षात आहे तोच विजयी होऊ शकतो. इथे वर्तमान काळाचा संबंध म्हणजे सगुणाचे ध्यान.
"न करिता सगुणाच्या ध्याना, भक्तीभाव कदा प्रगटेना.." श्रीसाईसच्चरितात आपण ही ओवी वाचतो .
हेच सगुणाचे ध्यान माणसाचे व परमेश्वराचे नाते वर्तमान काळात घट्ट करते. म्हणून जयंती हे ध्यानाचे रूप आहे. ह्या ध्यानाच्या मार्गाची अधिष्ठात्री ही जयंती आहे. सगुणाचे ध्यान केल्यानेच ही आदिमाता आम्हाला विजयी ठेवते.
म्हणूनच भक्ती वाढवण्यासाठी त्या त्या देवतेचा ध्यान मंत्र अतिशय महत्वाचा असतो. सगुण ध्यान म्हणजे समोर इष्ट देवतेचा फोटो ठेवून त्याच्या कडे बघता बघता त्याचे गुण गायन करणे.
अधिष्ठात्री म्हणजे आधार. सहजपणे खात्रीशीर यश देणारा रस्ता. माझे सगुणाचे ध्यान यशस्वी पणे पूर्ण होण्यासाठी पुरवणारी उर्जा म्हणजे जयंती नाव.
जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून परमात्म्याचे सगुण ध्यान करण्याचा प्रयास कराल, तेव्हा त्यातील बेस्ट तुम्हाला मिळावे, ह्यासाठी हा गजर मी (प.पू.बापू ) तुम्हाला दिला आहे. हा गजर करताना कमीत कमी ११ पट फायदा प्रत्येकाला मिळणार आहे. पुण्य वाढण्यासाठी पण व पाप कमी होण्यासाठी सुद्धा.
ज्या अर्थी आपला कलियुगात जन्म झाला आहे त्याअर्थी आपल्या पापाचे गाठोडे पुण्यापेक्षा जास्तच आहे.
म्हणून बिभीषणाची प्रार्थना आपल्यासाठी महत्त्वाची आहे,
"पापोsहं पापकर्माsहं पापात्मा पापसंभवः। त्राहि मां आदिमाते सर्वपापहरा भव॥".
सगुण ध्यानाचा मार्ग म्हणजेच जयंती मार्ग
२) मंगला : स्वतः मंगलमय असणारी व सर्वांचे मंगलच करणारी ती मंगला .
"सर्व मंगल मांगल्यै शिवे सर्वार्थ साधिके.." हिने केलेला महिषासुराचा वध हा त्याच्यासाठी मंगलच होता. असुरांना मारतानाही ही मंगलच असते कारण त्यात असुरांचेही मंगलच असते व विश्वाचेही मंगलच असते.
जेव्हा आपण ध्यान करतो, फोटोकडे बघतो तेव्हा प्रेमाने बघा, स्तोत्रे म्हणा. आपण आईची महाशक्ती म्हणून नाही तर आई म्हणूनच उपासना करायची आहे. जे शक्ती म्हणून उपासना करतात ते वाम मार्गावर जातात ते ह्या चंडिकेला उपयोगाची वास्तू समजतात.
म्हणूनच नेहमी मातरौपासना करा. ही माझ्या देवाची आई ह्या भावानेच तिच्याकडे बघा तेव्हा ती मंगला रूपाने तुमच्याकडे बघेल.
ध्यान स्मरण म्हणजेच मंगला. आई पुत्राचे नाते स्मरण ठेवले की तुमची ती आजी होते आणि आजी नेहमीच नातवंडांचे लाड करते. म्हणूनच हिची कधी शक्ती म्हणून उपासना न करता ही माझ्या परमात्म्याची माता ह्या रूपानेच उपासना करा.
आदिमाता कधीही बोकड किंवा रेडा ह्याचे बळी स्वीकारत नाही. जर कोणाच्या घरात बळी देण्याची प्रथा असेल व तुम्हाला नातेवाईकांचा विरोध चुकवता येत नसेल तर नंतर जुईनगरला जावून एक दत्त याग किंवा दोन व्यंकटेश याग प्रायश्चित म्हणून करावा.
आई जेवढी सौम्य तेवढीच उग्र आहे. ज्या क्षणी तुम्ही तिची फक्त शक्ती म्हणून उपासना करता तेव्हा तुमचे अनिरुद्ध बापुशी नाते असू शकत नाही. तर जेव्हा आई मानून उपासना करता तेव्हा जरी तुम्ही बापूला मानत नसाल तरी बापू तुमची काळजी घेईल .
जो कोणी परमात्म्याचे शब्द मानतो तो परमात्म्याचे बाळ बनतो मग आपोआपच त्या आदिमातेचेही बाळ बनतो. म्हणून तिच्या कुठल्याही रुपाची उपासना करताना आई मानूनच करा .
काही बाबतीत मी (प.पू.बापू) अतिशय कडवा आहे. मी म्हणतो म्हणून माझ्या आईची उपासना आई म्हणुनच व्हायला हवी, मला अटी चालत नाहीत .
ह्या इह लोकात फक्त माझ्याच (प.पू.बापू) terms चालतात. मी मर्यादा घालून दिली आहे.."पावित्र्य हेच प्रमाण". जर कोणी बापूंच्या नावावर खोटे पसरवत असेल तर बापू बसला आहे. बापूंशी नाते ठेवायचे असेल तर अट चालणार नाही आणि हा मार्ग म्हणजेच काली मार्ग.
३) काली : परमात्म्याशी व्यवहार बिनशर्त असला पाहिजे. अट चालणार नाही आणि काली म्हणजेच कुठलीही अट नाही.
महिषासूरमर्दिनीचा पहिला अवतार महाकाली. ब्रम्ह देवाच्या चुकीमुळे मधु- कैटभ निर्माण झाले. ह्या दोन वृत्ती म्हणजे मर्यादा तोडण्याची वृत्ती व मोहाची वृत्ती.
ह्या वृत्ती स्तुती व निंदा स्वरुपात आपल्या जीवनात येतात. स्तुतीने मनुष्य चढून जातो तर निंदेने पित्त खवळून उठते ह्यामुळे भक्ती मार्गावरून अध:पतन होते. हे मधु- कैटभ ब्रम्ह देवावार म्हणजे तुमच्या सृजनशील शक्तीवर, creativity power वर हल्ला करतात.
म्हणून देवाच्या कार्यात सहभाग घेताना unconditional सेवा व कार्य करता आले पाहिजे. स्तुती व निंदेच्या पलीकडचा मार्ग म्हणजे काली मार्ग. आम्हांला आईकडे प्रार्थना करायचा अधिकार आहे. अटी घालण्याचा नाही. आई ह्या तत्त्वाशी नाते जोडल्यावर कुठलीही अट घालण्याचा आपल्याला अधिकारच येत नाही .
गर्भाशयात सर्व बाजूंनी अंधारच असतो परंतु हा अंध:कार बाळाला protect करणारा असतो. हे अंधःकाराचे स्वरूप म्हणजे आईचे रूप. ह्याचा अर्थ काही जणांनी चुकीचा लावला व आईची उपासना म्हणजे अंधःकाराची उपासना असे पसरविले गेले. बाळाने जर गर्भात असताना आईला अटी घालण्याचा प्रयत्न केला तर abortion नक्की. म्हणूनच देवाला अटी घालण्याचे थांबवा.
अनेकदा घरातील व्यक्ती परत आली नाही तर देव पाण्यात ठेवले जातात ही अत्यंत घाणेरडी गोष्ट आहे. देवाला नकातोंड्डा पर्यंत बुडवून ठेवायचं अत्यंत अघोरी पद्धत, देवाला वेठीला धरून आपली कामं करून घ्यायची पद्धत. असे चुकून कधी तुमच्या हातून घडले असेल तर शांतपणे आज घरी गेल्यावर देवासमोर उभे राहून सांगा, " बापू माझे चुकले, मला माफ करा". काली मार्गामुळे क्षमा मिळते. जो अटी न घालता भक्ती करतो, तेव्हा ती आदिमाता व तिचे पुत्र त्यांच्या चुकासुद्धा पोटात घालतात. पुढचे नाव आहे भद्रकाली.
४) भद्रकाली : भद्र म्हणजे कल्याण आज फक्त अर्थ बघायचा आहे. जर मी अटी टाकल्या तर ही आदिमाता उग्र काली असते, जर अटी टाकल्या नाही तर भद्रकाली असते , म्हणजेच कल्याण करणारी असते.
ह्याच गजराच्या मार्गाने आपल्याला जायला हवे आणि आपण जाणारच आहोत.

Excerpts from Thursday Discourse dated 13 Jan 2011
Date: 14/01/2011
श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती संदर्भातील काही शंकांचे निरसन परम पूज्य बापूंनी ६ जानेवारी रोजी प्रवचनात केले होते. १३ जानेवारी रोजी झालेल्या प्रवचनाच्या आधी देखील परम पूज्य बापूंनी श्री मंगलचण्डीकाप्रपत्ती संदर्भात काही प्रश्नांचे निरसन केले.
हरी ॐ
आज परत काही प्रश्न बघायचे आहेत.
१) उडदाची डाळ चिकट असते तर सांबर कसे करायचे? नारळ सुका घालयचा की ओला?
-- खर सांगायचे झाले तर उडदाची आमटी हा नवरात्रातला common पदार्थ आहे. सांबर म्हणजे ज्यात विविध भाज्या घातल्या आहेत अशी तिखट आंबट गोड आमटी. ह्यात नारळ सुका आणि ओला दोन्ही चालेल.
उडदाच्या सांबराची एक रेसिपी परम पूज्य नंदाआईने सांगितली आहे.
रेसिपी : उडदाची डाळ पातेल्यात तेलात परतायची आणि लालसर झाली की पाणी घालायचे, ह्यामुळे चिकट पणा येत नाही. डाळ शिजवून पाणी उरले पाहिजे. (कुकरच्या ३ शिट्या करायच्या) ह्यात जे पाणी उरते ते नंतर आमटीसाठी वापरायचे.
उडदाची आमटी ही माझी (परम पूज्य बापू) सगळ्यात आवडती आमटी आहे. अतिशय चविष्ट पदार्थ आहे. उडीद म्हणजे उष्ण स्निग्ध, गुरु पदार्थ ,मनाला बुद्धीला ताजेतवाने व शांत करणारा पदार्थ. प्रत्येक अवयवाला पुष्टी देणारा असा हा उडीद म्हणूनच सगळ्यात पावन पदार्थ आहे.
ह्या उडदाच्या सांबारात कुठलाही सांबर मसाला घातला तरी चालेल. कांदा-लसूण वापरू शकता. हे सांबर पोळी, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता.(सर्व प्रकारच्या) इडली डोश्यासोबत खाल्ले तरी चालेल. जास्त करून तांदूळ, गव्हाचा वापर करा. हे खाल्यावर कळेल की पोटाला किती फ्रेश वाटते!! ह्यातील सगळे पदार्थ हे सम्यक उर्जा निर्माण करणारे आहेत.
प्रपत्ती करताना दुसर्यांच्या चुका काढत बसू नका. जी basic माहिती आहे त्यानुसार जल्लोषाने व समाधानाने प्रपत्ती साजरी करा.जर प्रपत्ती करताना काही चूक झालीच त्यासाठी तुमची आई समर्थ आहे.
हळद - कुंकू ह्यांचे विसर्जन करायचे.
तांदूळ- गहू प्रत्येकीने वाटून घ्यायचे व घरी घेवून जायचे. एक दाणा मिळाला की शंभर दाणे सारं तेवढंच महत्वाचं.
आता
ॐ मन्त्राय नमः
आपण बघत होतो सर्व बाधा प्रशमनम. ह्या आधी आपण वैखरी देवी व श्री गुरुकेंद्र बघितले. आज बंधन बाधा बघायची आहे .बंधन म्हणजे क्रियेला, गतीला अटकाव. जे करायचे आहे ते करायला न मिळणे म्हणजे बंधन.
घरी उशिरा न येणे, खोटे न बोलणे ही negative वाटत असली तरी चांगली बंधने आहेत.
बंधन बाधा ही दोन प्रकारची आहे -
१) स्व- कृत २) पर- कृत
तुमच्या प्रगतीच्या आड तुम्ही स्वतः येता म्हणजेच आपल्या दुर्गुणांमुळे जे काही आपण करून बसतो ते स्व-कृत बंधन. ही बाधा प्रयत्न्यपूर्वक दूर करावी लागते आणि यासाठी गुरूक्षेत्रम मंत्रच धावून येणार .
२) पर-कृत बंधन बाधा ह्याचे दोन प्रकार आहेत.
१) भौतिक - तुम्हाला चुकीचा सल्ला मिळणे, मुलगा-आईमध्ये, नवरा-बायकोत भांडण उत्पन्न होणे ही भौतिक बाधा आहे. याचबरोबर आपला सहकारी किवा शेजारी निंदा करतो तेव्हा देखिल भौतिक बाधा बंधन उत्पन्न होते.
२) अ-भौतिक - अ-भौतिक म्हटले की पहिल्यांदा जारण-मारण असेच विचार मनात येतात. ह्या गोष्टीच्या विचारात पण कधी अडकू नका. अश्या गोष्टींचे bacteria (विषाणू) कुठले ह्याच्याशी आपला संबंध नाही. आपल्याला हे bacteria कसे शरीरात घुसतात व त्यावर लस कोणती हे बघायचे आहे .
जेव्हा परीक्षेला एखादी कविता यायची असेल तर आपण ती सतत वाचतो, गुण गुणतो. पण परीक्षा झाल्यावर ती कविता आठवतही नाही. पण तेव्हा महिनाभर न ऐकलेले पिक्चरचे गाणे मात्र आपोआप आठवते. असे stop आणि start चे बटन हीच मनाची ताकद. आजचा प्रत्यक्षचा अग्रलेख ह्या वरच होता श्रेयस आणि प्रेयस. तुमच्या मनाला कायम प्रेयसाची ओढ तर बुद्धीला श्रेयसची ओढ असते.
आपली बुद्धीचे काम कुठपर्यंत ते मन ठरवते, काम झाले की मन आवडीच्या गोष्टींकडे वळत असते. बुद्धी कधी भ्रष्ट होत नाही मन भ्रष्ट होत असते. मनाच्याच साहाय्याने बंधनात अडकायला होते तर मनाच्याच साहाय्याने बंधनांतून बाहेर पडता येते.
मनाचे भाग ३ आहेत -
१) जागृत- बाह्य मन (conscious mind )
२) अजागृत - आंतर मन (sub conscious mind )
३) संक्षिप्त मन (interceptive mind )
बाह्य मन हे ज्ञानेन्द्रीयांशी जोडलेले पूर्ण पणे स्वतंत्र असते. तर आंतर मन हे आंधळे असते. हे केवळ बाह्य मनाच्या सहाय्यानेच बघू शकते . तरीही हे सगळ्यात सशक्त आहे कारण हे फार व्यापक आहे. म्हणूनच आंतर मन सगळ्यात प्रभावी ठरते. ह्या मनाला feed back बाह्य मनाकडून मिळत असतो. तर संक्षिप्त मन हे आंधळे असते व पांगळेही. जागृत व अजागृत मन ह्यांच्यामधला एक अतिशय सुंदर common point म्हणजे संक्षिप्त मन.
ज्यांची तुमचे वाईट व्हावे अशी इच्छा असते ती मंडळी तुमच्या कडची दैवी उपासना खंडित करण्यासाठी तुमच्या वैखरी देवीचे केंद्र व तुमचे श्रीगुरु केंद्र ह्या दोन केंद्रांचा तुमच्या संक्षिप्त मनाशी असणारा संबंध तोडण्यासाठी प्रयत्नशील असतात.
सदगुरू हा तुमच्या संक्षिप्त मनाचा रखवाला असतो. तुमच्या संक्षिप्त मनाचा राखणदार हेच सद्गुरूंचे प्रमुख कार्य असते.
जेव्हा तुम्ही सद्गुरुंपासून दूर जाता तेव्हा तुमचे संक्षिप्त मन कुठल्याही हल्ल्याला बळी पडु शकते. मग दुर्बळ संक्षिप्त मन चुकीच्या गोष्ठी स्विकारते. तुम्ही तुमचीच ताकद विसरून जाता, हीच बंधन बाधा .
म्हणूनच आमचे संक्षिप्त मन हे सदगुरूद्वारीचा श्वान झाले पाहिजे. कुत्रा हा नेहमी त्याच्या मालकाशी प्रमाणिक असतो, उपाशी असेल तरी तो त्याच्या मालकाने दिलेलेच अन्न खातो. आम्ही कितीही चुकलो तरी आमचे संक्षिप्त मन आम्हाला सद्गुरुंच्या ताब्यात देता आले पाहिजे. सद्गुरु त्यावर कसे कार्य करतात हे मी इथे सांगणार नाही.
आमचे सक्षिप्त मन सद्गुरुंच्या ताब्यात देण्यासाठी काय करावे लागते तर वावर, वापर अणि सवांद .
१) वावर म्हणजे जिथे जिथे मी जातो तिथे तिथे प्रथम सद्गुरु स्मरण मला करता आले पाहिजे .
२) वापर म्हणजे जी गोष्ट आम्ही वापरतो, कुठलीही नविन गोष्ट विकत आणली की प्रथम सद्गुरूस अर्पण करून मग ती वापरावी .
३) परंतु यात नवीन लग्न झालेल्यांनी आपली पत्नी अर्पण करतो असे म्हणण्याचे चाळे करू नका. तर सद्गुरुराया तुझ्या कृपेने मला चांगला/चांगली जोडीदार लाभला/लाभली हा भाव असावा.
३) संवाद - मला माझ्या सद्गुरुंशी कायम संवाद साधता आला पहिजे. मनात राग आला तर सद्गुरुंशी बोलू लागा. आपोआप क्रोध शांत होईल. व्यवहाराच्यावेळी सद्गुरुंचे स्मरण केले तर कधीच फसगत होणार नाही.
आमच्या वावर, वापर व संवादात सद्गुरु नाम आले की आपोआप संक्षिप्त मन समर्थ होणारच.
मन बुद्धि व शरीर ह्यांचे कार्य ह्या वावर, वापर, संवादामधुनच बनते म्हणुनच तुमचा वावर, वापर व संवाद नेहमी श्री गुरुंच्या ताब्यात असू दे, मग तुमच्या सुखाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही .