KOLHAPUR MEGA MEDICAL AND HEALTHCARE CAMP, PART - 1
|| हरी ओम ||
कोल्हापूर कॅम्प झाला.....
बापुकृपेने सेवा पण मिळाली.....
अगदी १ महिन्याआधीपासूनच माझी तयारी सुरु होती ..... कधी एकदा जाते असे झाले होते मला....
२९ जानेवारी चा दिवस उजाडला..... रात्री उशिरा झोपलो होतो .. तुषारचा वाढदिवस होता जेवण खावन झाले.... १-२ वाजता कसे तरी सर्व आवरून झोपलो होतो.....२ वाजता झोपून ४ वाजता उठलो.....
सर्व रात्री चिडवत होते , अरे तुम्ही मुली make up करू नका नाहीतर आम्ही पोहोचणार नाही...
मी म्हटले नाही बाप्पाकडे जायचे आहे न तुमच्या आधी मी तयार असणार , सकाळी मस्त उठले.... पण माझी तब्बेत खुपच बिघडली होती तसा २ दिवस आशीपासूनच ताप होता......
कॅम्प ला जायचं म्हणून कधीही डॉक्टर कडे न जाणारी मी या वेळेस व्यवस्थित डॉक्टर कडे जाऊन औषध घेऊन आले......
पण २९ ला असे वाटले कि आता मी जाऊच शकणार नाही..... एवडी तब्बेत बिघडली.... तुषार म्हणे नैना काय करतेस ? येणार आहेस काय? मी म्हटले काय व्हायचे ते होऊ देत मी येणार.....
असे करत निघालो ..... कोल्हापूरच्या वाटेवर निघालो.....
न्याहारी झाली त्यात पोहे, उपमा, इडली, मेदुवडा अशी मेजवानी होती..... नंतर बापूंचे गजर करत करत आम्ही साताऱ्याला आलो ... तेथील जेवण अप्रतिम होते.....आणि स्वीट डीश तर अप्रतिमच होती....
नंतर पुन्हा निघालो कोल्हापूरला माझी राहण्याची सोय LD LAWN येथे होती..... मस्त पैकी फ्रेश झालो, चहा घेतला, तेथील चहाची चव अजूनही जिभेवर तशीच आहे, नंतर जेवायला आलो एकूणच जेवणाची सजावट आणि चव तसेच मेनू एकदम भारी होते..... आणि स्वीट डीश तर अप्रतिमच होती....
जेवणानंतर प्रत्येक जन आपापल्या तात्पुरत्या निवासस्थानी निघून गेले..... त्या दिवशी लवकर झोपलो ... सकाळी ४ चा गजर लावला पण ३.३० लाच जाग आली का तर सेवेला आपल्या मुले उशीर नको आणि आधी एकदा पोहोचून आईला आणि दादांना बघेन असे झाले होते...... मी पहिल्यांदाच जाणार होते त्यामुळे तर कुतूहल अजूनच....
सर्वांचे आवरल्यानंतर आम्ही निघालो, थंडी एव्हाना खुपच असते पण बापू कृपेने त्या दिवशी नव्हतीच मुळी.....
पुन्हा आमची सर्व टीम गजर घेत घेत पेन्दाखले गावात पोचलि ..... स्वागत करायला सूचित दादा उभेच होते दादांना "हरी ओम" करून नाश्त्याचे कुपन घेऊन मी रांगेत उभी राहिले.... तोच आई आली मस्त् पिवळी साडी .... हिरव्या काठाची आई अगदी सुर्याकीरनांपेक्षा पण जास्त चमकत होती ...... लांबूनच आईचे ते सुंदर रूप पाहून आनंद घेतला .... आणि आई कडे पोहोचण्यासाठी पटापट पुढे सरकले... नाश्ता घेतला खरा पण खाल्ला नाही... ती डीश एका वीराच्या हातात देऊन मी आई आणि दादांचे फोटो काढण्यात गुंग झाले.. परत भानावर आले अरे आपण सेवेला आलो आहोत मग पटापट नाश्ता करून आम्ही आमच्या ग्रुप च्या लाईन मध्ये गेलो...जाताना पौरस सिंह आणि स्वप्निलसिंह सेवा करत होते.... पौरस सिंह डीश पुसत होते आणि स्वप्नील सिंह नाश्त्याचे कुपन गोळा करत होते खरच जरा पण गर्व नाही त्यांना कि आपण बाप्पाचे मुलगा किंवा जावई आहोत ..... Hats off to both of them....
माझा ग्रुप न. ३ होता.... आणि आम्हाला मांजरे, पारीवाने, गेलवडे आणि पाटीलवाडी या गावांमध्ये वाटपासाठी जायचे होते. पहिले आम्ही सर्वानी चेन सिस्टम ने ट्रक लोड केला ... पौरससिंह आणि निष्ठा वीरा पण होते आमच्या बरोबर....
त्या नंतर आम्ही आपापल्या टेम्पो मध्ये बसून सेवेला निघालो, मांजरे येथे उतरल्यानंतर तेथील मुलांना आणि गावाकार्याना भेटलो अभंग घेतले, नाचलो वगेरे नंतर आमच्या coordinators नि आमच्या ग्रुप चे दोन भाग केले , एक तिथेच मांजरे गावात थांबला आणि दुसरा ग्रुप गेलवडे साठी निघाला....
तिथे उतरलो.. गावातल्या मेम्बेर्स नि मस्त पाला पाचोळा टाकून मांडव बनवला होता....आम्ही थोड्या वेळ बसलो सर्वांच्या गाठी भेटी घेतल्या, अभंग घेतले, सर्वाना चेक अप साठी या असे सांगितले....सर्वच खूप खूप प्रेम करत होते... अगदी आपल्या सख्ख्या आजी आणि आई सारखे......खूप छान वाटले... नंतर शिस्तीत वाटप झाले..... तदनंतर त्यांनी आमच्यासाठी पोहे आणि चाह बनवला होता .....आम्ही ते घेतले तसेच दुपारचे जेवण सुद्धा त्या सर्वांबरोबर तिथेच केले....आणि पाटीलवाडी साठी निघालो...
पाटीलवाडी मध्ये हि तसेच प्रेम, अभंग, अनुभव तेथील एक अभंग तर खुपच छान होता मी लिहूनही आणला आहे ..... सर्वांनाच शेअर करणार आहे मी तो.....
तिथे सुद्धा पोहे आणि चाह होताच .....ते घेऊन आम्ही पुन्हा परीवाने येथे आमच्या पहिल्या ग्रुप मध्ये आलो ... ते गाव मोठे असल्या मुळे तेथे जरा जास्त वेळ लागला , तसेच ते गाव तसे नवीनच होते.... त्यामुळे नेलकटर, फनी वगेरे सर्व गोष्टी तेथे देण्यात आल्या....
नंतर आम्ही गजर घेत कॅम्प च्या वाटेने निघालो... पोहोचलो कॅम्प साइट वर सत्संगची पूर्ण तयारी झालेलीच होती मी मस्त पैकी पुढे जाऊन बसले .... आई आली नव्हती तेव्हा...नंतर थोड्या वेळाने आई आली, सर्वच आले, दादा, आई, पौरस सिंह, स्वप्निलसिंह, निष्ठावीरा, शाकम्बरीवीरा आणि इतर सर्व आले, सत्संग सुरु झाला.....एकावर एक अशी खूप छान छान गाणी, अभंग सुरु झाले, मला तर मी बसलेली आठवतच नाही.....फक्त नाचतच होते, मीच नव्हे सर्वच बेभान होऊन नाचत होते..आणि त्यात मला तर आईच्या पुढ्यात नाचायला भेटत होते... मग तर धमाल च, वरती पौरस सिंह, स्वप्नील सिंह, सुनिलसिंह, आणि अजून बाकी सिंह ... जागा कमी असताना पण तिथेच मजा करत होते, नाचत होते, आई आणि निष्ठावीरा, शाकम्बरीवीरा तिथेच बसून मस्त डोलत होत्या....त्यातील सर्वच गाणी खुपच मार्मिक आणि अर्थपूर्ण होती, त्यांचे वर्णन करायला शब्द नाही आहेत माझ्या कडे... एक दोन गाणी आपल्या लाडक्या नंदाई वर होती.... आई एवडी गोड हसत होती न तेव्हा.... cute killing smile...... आणि नंतर शेवटी गोड " श्री राम " म्हणायची....
अशा रीतीने..... सत्संग सर्वानी enjoy केला....
आम्ही आईला हरी ओम बोलून परतलो.. रात्री १ वाजता झोपलो...अशा रीतीने पहिला दिवस कुठे आणि कसा गेला ते समजलेच नाही आम्हाला....मस्त मजा आली सेवा करताना ....आई बापू आणि दादानी करून घेतली आम्हा सर्वांकडून ती......
श्री राम बापू, आई आणि दादा....